नाशिक जिल्ह्यातील धरणांचा विसर्ग घटला; सतर्कतेचा इशारा कायम

0
नाशिक । सोमवारी नाशिकमध्ये पावसाने थोडीशी मोकळीक दिली. धरण क्षेत्रातदेखील पाऊस कमी होता त्यामुळे हळूहळू धरणातून होत असलेला विसर्ग कमी करण्यात आला. आज सकाळी आठ वाजेच्या आकडेवारीनुसार गंगापूर धरणातून पाच हजार क्युसेस असलेला विसर्ग आता २०८० क्युसेस याप्रमाणे कमी करण्यात आला.

धोक्याची पातळी घटली असली तरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा कायम आहे. मागील दोन दिवसांपासून सातत्याने पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता.  पुराचे परिमाण समजल्या जाणार्‍या दुतोंड्या मारूती पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने पुराने धोक्याची पातळी ओलांडल्याचे द्योतक मानले जाते. त्यामुळे नदीकाठच्या रहीवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता होळकर पुलावर जवळपास दहा हजाराने कमी क्युसेकपाणी आहे. म्हणून येथील पूर परिस्थिती निवळली आहे.

जिल्ह्यातील दारणा धरणातून आज सकाळी ८ वाजता ०४ हजार ४२० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. कडवातून 2658 क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून २० हजार १६  क्युसेकचा विसर्ग करण्यात आला.  तर होळकर पुलाखालून सकाळी आठ वाजता ५४३३  क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

LEAVE A REPLY

*