नाशिकच्या ‘सह्याद्री सायकलिस्ट’ टीमने पूर्ण केली अमेरिकेतील ४८०० किमी स्पर्धा

0

रॅम अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्रातील सायकलीस्टने पुन्हा एकदा यश संपादन केले आहे.

नाशिकच्या टीम सह्याद्रीने आठ दिवस दहा तास आणि सोळा मिनिटात ही स्पर्धा पार केली. सांघिक गटामध्ये नाशिकच्या डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील, युरोपात असलेले नाशिकचे डॉ. संदीप शेवाळे व मुंबईचे पंकज मार्लेशा यांचा समावेश होता. या टीमने नवव्या क्रमांकाने ही रेस पूर्ण केली.

त्याआधी, नाशिकचे कर्नल डॉ. श्रीनिवास गोकुलनाथ यांनी वैयक्तिक सोलो गटात रविवारी (दि.२५) सातव्या क्रमांकावर राहून ११ दिवस १८ तास ४५ मिनिटात ही रेस पूर्ण केली.

तर नागपूरचे अमित समर्थ यांनी ११ दिवस १८ तास ११ मिनिटात ही रेस पूर्ण केली. ते नवव्या स्थानावर होते. सोलो सायकल प्रकारात एकच जन हे अंतर पार करतो तर समूहप्रकारात चार जणांच्या टीमने हे अंतर पार केले. यामध्ये टप्प्याटप्प्याने हे सायकलिस्ट हे अंतर कापत होते.

अशी पोहोचली सह्याद्री सायकलिस्ट टीम

LEAVE A REPLY

*