Photo Gallery : विठ्ठलनामाच्या गजरात निघाली ‘सायकलीस्ट’ची ‘पंढरपूर वारी’

0
नाशिक | नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून आज नाशिकमधील सायकलीस्टने पंढरपूरकडे प्रस्थान केले.

आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या सायकल वारीला मोठ्या संख्येने सहभाग लाभला आहे.

वारीचे हे सहावे वर्ष असून या वारीमध्ये वैशिष्टय म्हणजे नाशिक सायकलीस्टचे ४ सायकलस्वार त्र्यंबकेश्वर शहरातील निवृत्तीनाथ आश्रमापासून नाशिक सायकलीस्टचा स्वज घेऊन निघाले.

त्यांनी आज गोल्फ क्लब येथून सर्व सायकलीस्ट वारकऱ्यांना घेऊन मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने कूच केली. पुढे सिन्नर येथे त्यांचे लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले.

पुढे लोणी येथे त्यांनी आजच्या दिवसाचा अर्धा प्रवास संपवून जेवणाचा आस्वाद घेतला. या वारीचे वैशिष्ट्य म्हणजे सायकलचे रिंगण घालण्यात येणार असून असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. पंढरपूर जवळच्या खेडलेकर महाराज आश्रमाच्या मैदानात हे सायकल रिंगण घालण्यात येणार आहे. हे सर्व क्षण अनुभवण्यासाठी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलीस्टमध्ये कुतुहुल निर्माण झाले आहे.

या सायकल वारीसाठी ५०० हुन अधिक सायकलीस्ट सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्याबाहेरील सायकलीस्टदेखील या वारीत सहभागी झाले आहेत.

यात मुंबई येथील रवींद्र क्षीरसागर (एसीपी, मुंबई पोलीस), वाल्मिक पाटील (एसीपी, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक खाते), कन्हैय्या थोरात (एसीपी, ठाणे शहर), निलेश धोटे (ठाणे आरटीओ) यांच्यासोबतच नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याचे पीआय मधुकर कड हे सुद्धा वारीमध्ये सहभागी झाले आहेत.

तसेच जाता जाता सिन्नर येथून ४० सायकलीस्ट त्यांच्या ताफ्यात दाखल झाले. पुढे अहमदनगर येथून १०, पुणे, मुंबई सारख्या महानगरातूनही सायकलीस्ट वारीमध्ये सहभागी झाले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*