एनआरएम, बीआरएम सायकल राईड‌्स उत्साहात

0
नाशिक : नाशिक रँडोनर्स मायलर्स या उपक्रमाच्या पहिल्या पर्वातील ११ वी फेरी उत्साहात पार पडली. ८० किमीची ही राईड गंगापूर नाका-मखमलाबाद-गिरणारे-पिंपळगाव गरुडेश्वर-महिरावणी-अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-विल्होळी -पाथर्डी फाटा अशी आत्तापर्यंतच्या सर्वात अवघड अशा घाट मार्गावर आयोजित करण्यात आली होती.
४२ सायकलीस्टसने या राईडमध्ये सहभाग नोंदवला. २५ सायकलीस्टसने ही राईड वेळेत पूर्ण केली. ब्रेव्हेट रँडॉनर्स मायलर्स (बीआरएम) या लांब पल्ल्याच्या सायकलिंगची तयारी करण्यासाठी ही राईड आयोजित केली होती. 
 
नाशिक पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अरुण दास व दीक्षा दास या दाम्पत्यानेही एनआरएम १.११ या राईडमध्ये सहभाग नोंदवला.
 
सलग ११ राईड यशस्वीपणे पूर्ण करणारे शिशिर आचार्य व डॉ. रवी चांदोरे यांनी एनआरएमच्या पहिल्या पर्वातील १२ वी राईड पूर्ण केल्यास ते एनआरएमच्या इतिहासातील पहिलेच प्लॅटीनम मेडलचे हक्कदार बनण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाची जबाबदारी धीरज छाजेड, गणेश पाटील, विकाश जैन यांच्याकडे आहे.
२०० किमीची बीआरएम राईड उत्साहात
 
२०० किमीची बीआरएम राईड नाशिक शहरात राबविण्यात आली होती. मुंबई नाका पासून सुरेगाव (औरंगाबाद रोड) व परत मुंबई नाका अशा मार्गावरील या फेरीत एकूण २३ सायकलीस्टसने यात सहभाग नोंदवला.
यातील २० सायकलीस्टसने यशस्वीपणे वेळेत (१३;५ तासाच्या आत) हे अंतर पार केले. यात योगिता घुमरे आणि चांदवडच्या मिता चांदोरे या दोन महिलांसह डॉ. मनीषा रौदळ आणि अॅड. दत्तात्रेय चकोर यांनी टँडम बायसिकलवर २०० किमी हे अंतर केवळ ९ तास ३१ मिनिटात कापले.
 
महाजन बंधूंपैकी एक असलेले डॉ. महेंद्र महाजन यांनी विना गिअर २४ इंची अॅटलस सायकलवर केवळ ९ तास व १७ मिनिटात २०० किमीचे अंतर कापले.
केवळ महागड्या व गिअर असलेल्या सायकल्सवरच सायकलिंग करून एवढे अंतर पार होऊ शकते हा समज दूर करण्यासाठी हा प्रयोग करत यशस्वीपणे सर्वात कमी वेळेत हे अंतर पार केले.
सायकलिंग सुरु करायची म्हणून मुले महाग अशा सायकल घेऊन देण्याचा हट्ट पालकांकडे करतात. रस्त्यावर सकाळी सायकलीस्टस दिसल्यानंतर ही सायकल महागडीच असेल असा विचार केला जातो. मात्र आपल्या समाजात असे अनेकवेळा सर्वसामान्य व पालक वर्ग आपल्या मुलांना सायकल घेऊन देऊ शकत नाहीत.
हा समज दूर करण्यासाठी व दीर्घ पल्ल्याच्या सायकलिंगसाठी महागडी सायकलच हवी असे नसून इच्छाशक्ती आणि शारीरिक तंदुरुस्ती असेल तर सध्या सायकलवर सुद्धा दीर्घ पल्ल्याची सायकलिंग करता येऊ शकते असा विश्वास डॉ. महाजन यांनी दिला आहे.
या राईडचे संयोजन नाशिक सायकलीस्टसचे डॉ. महेंद्र महाजन करत असून नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे वर्ष असलेल्या या उपक्रमाची नव्या वर्षाची ही पहिलीच राईड होती. प्रत्येक महिन्यात एका राईडचे २००, ४००, ६००, १००० किमी अशा विविध अंतराच्या राईड्सचे आयोजन होत असते.

LEAVE A REPLY

*