Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ट्रकचालकाने वेळीच गाडी थांबवली असती तर ‘प्रेम’ वाचला असता; सिन्नर बायपासनजीक सायकल वारीतील चिमुरड्याचा मृत्यू

Share

नाशिक | प्रतिनिधी

पंढरपूर सायकल वारीसाठी जात असेलेला नऊ वर्षांचा वारकरी प्रेम निफाडे याचा अपघाती मृत्यू झाला. सिन्नर बायपासजवळ त्याच्या सायकलला एका ट्रकने मागून धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला होता, त्यास रुग्णालयात दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आईवडील आणि प्रेम तिघेही वेगवेगळ्या सायकलीने पंढरपूरकडे प्रयाण करत होते, रस्त्यातच मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरवर्षीप्रमाणे आज नाशिकहून पाचशेपेक्षा अधिक सायकलिस्टने पंढरपूरच्या दिशेने कूच केली. यामध्ये अबालवृद्धांसह सर्वांचीच उपस्थिती होती. आजच्या पंढरपूर सायकल वारीसाठी आईवडिलांसोबत नऊ वर्षांचा प्रेमही सायकल वारीला निघाला होता.

मजल दरमजल करत सिन्नरचा घाट ओलांडला. तोच सिन्नर बायपासजवळ आला असताना त्याच्या सायकलला मागून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आयशर ट्रकचालकाने धडक दिली. यात प्रेम रस्त्यावर कोसळला. ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जर आयशर चालकाने गाडी अपघात घडताच थांबवली असती, तर प्रेमचा जीव वाचला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी ‘देशदूत’शी बोलताना दिली.

अपघातस्थळापासून जवळपास ८० टक्के सायकलीस्ट पुढे निघाले असल्यामुळे वारी पुढे नेण्यात आली. तर काही सायकलीस्ट प्रेमच्या आईवडिलांसोबत राहून ते माघारी फिरले.

१६ वर्षांखालील सायकल स्वारांना बंदी

आजच्या अपघातानंतर १६ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सायकलस्वारांना पंढरपूर वारीसाठी बंदी घालण्यात आली. ज्यांना परत यायचे त्यांना नाशिकला आणण्यात आले तर ज्यांना पंढरपूरला जायचे होते त्यांना वाहनात बसवून पुढे नेण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!