Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये ट्रेक फाउंडर्स राईडची यशस्वी सांगता

Share

नाशिक : अमेरिकेची ट्रेक बायसिकल कंपनी आणि नाशिकचे सायकलचे डीलर लुथरा एजन्सी यांनी संयुक्तपणे आज रविवार (दि. २१) रोजी नाशिकमध्ये ” ट्रेक फाउंडर्स राइडचे आयोजन करण्यात आले होते. या राईडची यशस्वी सांगता झाली. यामध्ये १२० सायकलस्वारांनी आपला सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला आहे.

या राईडची सुरवात जुना गंगापूर नाका सिग्नल येथून करण्यात आली. त्यानंतर जहान सर्कल, महात्मा नगर, ए. बी. बी. सर्कल, त्रिंबक रोड मार्गे संदीप फौंडेशन आणि शेवट ग्रेप काउंटी रिसॉर्ट असा राईडचा मार्ग होता. या राईडमध्ये या सर्व सायकलस्वारानी या मार्गावरून २५ किलोमीटर सायकलिंग केले. यामध्ये सायकल या प्रकारात विविध उपक्रम आणि रेकॉर्ड केलेले डॉ. महिंद्र महाजन, मेजर कुलकर्णी, जयंत कंसारा, राम, सौ. मनीषा रौंदळ यांच्यासह नाशिकच्या सर्व सायकल स्वारांनी सहभाग घेऊन नाशिककरांच्या सायकल चळवळीचा प्रत्यय दिला.

यावेळी राज लुथरा यांनी सांगितले की सायकलचे हब म्हणून नाशिकचे नाव पुढे आले आहे. नाशिकमध्ये सायकलिंगचे चांगले वातावरण आहे. नाशिकमध्ये जास्तीत जास्त सायकलपटू तयार व्हावे आणि नाशिकच्या सर्व नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने नाशिकमध्ये या ” ट्रेक फाउंडर्स राइड ” या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

ही सायकल चळवळ अशीच पुढे जावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे यासाठी आम्ही दर महिन्यांच्या पहिल्या रविवारी अश्या राईडचे आयोजन करत असतो. तसेच महिलांमध्येही सायकलची आवड निर्माण व्हावी यासाठी महिलांसाठी दर महिन्याला आम्ही असे उपक्रम करत आहोत याचाच याक भाग म्हणून आजच्या या ट्रेक फाउंडर्स राइडचे आयोजन केले आहे असे सांगितले.

या ट्रेक फाउंडर्स राइड आणि अमेरिकेच्या ट्रेक बायसीकलबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आज दिनांक २० जुलै रोजी पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमेरिकेची ट्रेक बायसिकल कंपनीचे भारतातील गुडगांव येथिल प्रमुख नवनीत बंका यांनी सांगितले की उत्साही सायकलस्वारांना एकत्र आणणे, समाजाच्या एकत्रीकरणाला हातभार लावणे आणि जास्तीत जास्त जनतेने सायकलचा अवलंब करून स्वतःचे आरोग्य आणि वातावरणातील समतोल राखणे हे या राईडचा प्रमुख उद्देश आहे असे सांगितले.

या उपक्रमाद्वारे नाशिकच्या जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा अवलंब करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठीं मदत करावी असे आवहान यावेळी नवनीत बंका आणि राज लुथरा यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!