Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; सायकलिस्ट बाळासाहेब वाकचौरेंनी फडकवला पॅरिसमध्ये तिरंगा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक सायकलिस्ट्सने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवला आहे. सायकलीस्ट बाळासाहेब वाकचौरे यांनी अतिशय खडतर समजली जाणारी सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. वाकचौरे यांच्या आजच्या विजयाने नाशिकच्या शिरपेचा पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अधिक माहिती अशी की, सायकलीस्ट बाळासाहेब वाकचौरे हे पॅरिस आयोजित सायकल स्पर्धेत सहभागी झाले होते.  अतिशय खडतर असे या स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत ९० तासांमध्ये १२२० किमी अंतर पार करायचे असते. यादरम्यान कुठल्याही प्रकारची सपोर्ट सिस्टीम स्पर्धकाला मदत करत नाही. त्यामुळे मोठी रिस्क घेऊन या स्पर्धेला समोरे जावे लागते.

१२२० किमीचे अंतरही डोंगर-दऱ्या, नद्या, चढ-उताराचे असते. तीन ऋतूंचे मिश्रण तसेच काही ठिकाणी थंडी ऊन पाऊसदेखील यादरम्यान स्पर्धकांना झेलावा लागतो.

१८ ऑगस्टला या स्पर्धेला प्रारंभ झाला त्यानंतर चार दिवसांनी म्हणजेच २२ ऑगस्टला स्पर्धा पूर्ण झाली. जगभरातून एकूण साडेसहा हजार स्पर्धक या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भारतातून या स्पर्धेसाठी ३३१ स्पर्धकांची उपस्थिती होती.

स्पर्धेचे वैशिष्ट्य 

या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची सपोर्ट सिस्टीम नसते. सोलो कॅटेगिरीमध्ये ही स्पर्धा पार पडते. स्वावलंबी अशी ही स्पर्धा समजली जाते. स्पर्धेदरम्यान कुठलीही अडचण आल्यास ती स्पर्धकाला सोडावी लागते. एकूणच मोठ्या धाडसाने सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होतात.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!