Type to search

Breaking News टेक्नोदूत नाशिक मुख्य बातम्या

सावधान! तुमच्या व्हाट्सअप ग्रुपवर ‘हा’ मॅसेज आला असेल तर?

Share

नाशिक : सध्या संदेशाचे सर्वात वेगवान माध्यम म्हणून व्हाट्सअँप कडे पहिले जाते. आज भारतात तीस ते चाळीस कोटीच्या आसपास व्हाटसअँप युजर आहेत. यामध्ये काही वैयक्तिक तर काही ग्रुप वर मॅसेज केले जातात. परंतु हेच मॅसेज हॅक झाले तर ? आणि या मॅसेजचा वापर करून तुमच्या नावे चुकीचं माहिती पसरवली तर ? होय हे शक्य आहे.

व्हाट्सअँप वर नुकताच एक मॅसेज फिरत असून हा एनकोडेड मॅसेज असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे. सध्या आपण व्हाट्सअँप ने चॅटिंग करताना दिलेल्या सुरक्षित क्रिप्टोग्राफी या माध्यमातून चॅटिंग करत आहोत, हे अतिसुरक्षित चॅटिंग आहे.

परंतु यातून हॅकर्स मॅसेज डिकोड करत असून यामुळे व्हाट्सअँप युजरला ‘आस्की’ नावाचा कोड व्हाट्सअँप वर येत असून हा आपल्याला वाचत येणं शक्य नाही . तरीही यूजरनी व्हाट्सअँप चॅटिंग करताना क्रिप्टोग्राफीचा वापर करणे गरजेचे आहे

दरम्यान सायबर तज्ज्ञांचे मत असे आहे कि, हा मॅसेज आल्यानंतर आपण लगेचच तो ओपन करून कोणत्या वेबसाइटवरून आला आहे , याची माहिती घेईन त्वरित ती सायबर तज्ज्ञाकडे पोहचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन तंत्रज्ञान वापरताना आपण काय चॅटिंग करत आहोत किंवा कुणाशी करत आहोत याबाबत सावधगिरी बाळगा. आपल्या स्वतःच्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये असे मॅसेज येत असतील त्या युजरपासून सावध राहा.
-तन्मय दीक्षित, सायबर तज्ञ

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!