एक फोन, तीन नंबर अन् २४ तरुणींचा ऑनलाईन छळ; संशयित जेरबंद

एक फोन, तीन नंबर अन् २४ तरुणींचा ऑनलाईन छळ; संशयित जेरबंद

नाशिक । वेगवेगळ्या मार्गाने मोबाईल क्रमांक मिळवित आपल्याकडे तुझी अश्लिल चित्रफीत असल्याची बतावणी करीत शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थीनी तसेच नोकरदार युवतीना थेट लॉजवर येण्याची धमकी देणार्‍या विकृतास शहर सायबर पोलिसांनी अटक केली. संशयिताने तब्बल 24 युवतींचा ऑनलाईन छळ केल्याचे पोलीस तपासातून समोर येत आहे.

युवराज बाजीराव डुंबरे (रा. मुसळगाव एमआयडीसी, सिन्नर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. या प्रकरणी पंडित कॉलनीत राहणार्‍या 22 वर्षाच्या युवतीने तक्रार दाखल दिली आहे. याबाबत सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची धुळे येथील असलेली युवती नोकरी करून नाशिक शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. संशयिताने तिचा मोबाईल नंबर मिळवित सोशल मिडीयाच्या माध्यमातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र युवतीने त्याला प्रतिसाद दिला नाही.

रविवारी (दि.8) संशयिताने युवतीला मॅसेज करून माझ्या मोबाईलमध्ये आपल्या दोघांची अश्लिल चित्रफिती असल्याची धमकी दिली. प्रारंभी युवतीने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र यानंतर आरोपीने तीला ही अश्लिल क्लिप व्हारयल करण्याची धकमी देत तीला शहरातील एका लॉज वजा हॉटेलवर बोलवले. या सर्व प्रकाराने हादरलेल्या युवतीने आपल्या मैत्रींणीचा सल्ला घेत सायबर पोलिस ठाणे गाठले.

या प्रकरणी सायबर पोलिसांनी विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमनुसार गुन्हा दाखल केला. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे यांच्या पथकाने संशयिताचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक केली. पोलीसांनी तपास केला असता संशयिताने एका मोबाईलमधील वेगवेगळ्या तीन क्रमांकाच्या माध्यमातून शहरातील तब्बल 24 युवतींचा ऑनलाईन पिच्छा करून त्यांचा मानिकस छळ केल्याचे समोर आले आहे. त्याच्या अधिक सखोल तपास करण्यात येत असून त्याने आनखी किती महिला व मुलींना त्रास दिला याचा शोध पोलीस घेत असून. असा त्रास झाला असल्यास तक्रारीसाठी युवतींनी पुढे येण्याचे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com