लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा आज स्मृतीदिन

0

आज मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा स्मृतीदिन.आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे. विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. जांभूळ आख्यान मांडणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा आज स्मृतीदिन .

वयाच्या आठव्या वर्षापासूनच कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली होती. विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी १० चित्रपटांमध्येही काम केले आहे.

शाहिर उमप यांनी लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केला होता. त्यात पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी असे अस्सल मऱ्हाटमोळी कलाप्रकार होतेच; पण कव्वाली आणि गझल गायनांतही ते आघाडीवर होते.

“उमाळा’ हा त्यांचा गझलसंग्रहही प्रसिद्ध आहे. आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळवून दिले. त्यांनी सतत आपल्या गाण्यांतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. ‘अबक, दुबक, तिबक’, ‘अरे संसार संसार’, ‘खंडोबाचं लगीन’ आणि ‘जांभूळ आख्यान’ ही त्यांची काही अविस्मरणीय नाटके आहेत.

LEAVE A REPLY

*