शुभम पार्क खून प्रकरणी दोघांना अंबड परिसरातून अटक

0

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशिक परिसरातील शुभम पार्क येथे झालेल्या खुनातील दोन्ही संशयितांना आज दुपारी अटक करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना अंबड परिसरातून दुपारी अटक करण्यात आल्याचे समजते.

काल दुसऱ्या संशयिताची ओळख पटली होती. त्यानंतर दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली होती. याबाबतची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी सोमनाथ तांबे यांनी देशदूतला दिली होती.

शुक्रवारी(दि.६)  दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान शुभम पार्क येथे भर दिवसा वैभव गांडोळे या युवकाचा तिक्ष्ण हत्याराने वार करून दोघांनी खून केला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

या खुनातील संशयित शुभम पेंढारे याची ओळख पटली होती त्यानंतर काल (दि.१०) दुसरा संशयित प्रज्वल चौधरी याची तपासाअंती ओळख पटली होती.

तेव्हापासूनच पोलिसांची पथके संशयितांच्या तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती. यात गुन्हे शाखेचे दोन व अंबड पोलिसांची तीन अशी पाच पथके आरोपींच्या शोधात निघाले होते. अखेर आज दुपारी दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

*