Type to search

इलेक्ट्रिक वाहनाचे डीलरशिपचे आमिष दाखवून सहा लाखांचा गंडा

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इलेक्ट्रिक वाहनाचे डीलरशिपचे आमिष दाखवून सहा लाखांचा गंडा

Share

इंदिरानगर वार्ताहर : इलेक्ट्रिकल्स वाहनाचे डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून सहा लाखाची फसवणुकीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजय कुमार गवई व वैशाली गवई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तमराव वाघमारे वय (६६) राहणार रविराज पार्क तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी २००७ मध्ये एका वृत्तपत्रात इलेक्ट्रिकल्स वाहनांची डीलरशिप देणे आहे, अशी जाहिरात वाचून या पत्त्यावर संपर्क साधून कंपनीचे कार्यालय केके ई व्हिईकल डिकॉम होम समर्थ नगर पाथर्डी फाटा येथे गेले. दरम्यान सर्व व्यवस्थित असल्याचे पाहून डीलरशिप घेण्याचे निश्चित केले. आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये कंपनीच्या खात्यात वर्ग केले.

त्यानंतर कंपनीच्या कार्यालयात येऊन वृषभ मंदुर यांच्याशी एग्रीमेंट करून त्यांनी चार लाख वीस हजार रुपयांचा एक चेक तर दुसरा चेक एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा दिला. नंतर त्यांनी व्हेईकलचे सहा लाख सासष्ठ हजार रुपयांचे बिल दिले. परंतु यानंतर वारंवार ऑफिसच्या चकरा मारून कुठलेही वाहने देण्यात आले नाही. तसेच पैसेही परत केले नाही. आतापर्यंत फिर्यादी कडून एकूण सहा लाख सासष्ट हजार रुपये घेत फसवणूक केली.

याप्रकरणी उत्तमराव वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय कुमार गवई व वैशाली गवई राहणार अमरावती सध्या सावरकर नगर, गंगापूर रोड येथे राहत असून यांच्या विरोधात भादवि कलम ४२०/३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोरे अधिक तपास करत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!