Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिक : चिंचबन परिसरातील २१ लाख चोरीप्रकरणी दोघांना गुजरात राज्यातून अटक

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या आठवड्यात पंचवटी परिसरातील चिंचबन येथे एका व्यापाऱ्याचे २१ लाख ५० हजार रुपये रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक शहर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवत गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनीट १च्या पथकाने  अटक केली आहे.

शिसेदिया उर्फ मुन्ना जयसिंग राठोड व रवी उर्फ राविया बच्चू इंद्रेकर ( रा.कुबेरनगर अहमदाबाद) अशी या संशयितांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, रविवार कारंजा येथील धूत ट्रेडर्स दुकानाचे व्यापारी सुयोग धूत हे (दि.28) जून रोजी मालेगाव स्टड परिसरातून घराकडे त्यांच्या चारचाकी वाह्नाने निघाले होते.

धूत यांच्या मागावर असलेल्या दोघा संशयितांनी त्यांच्याशी दुचाकीला कट का मारला यावरून वाद घातला. त्यानंतर अन्य दोघांनी दोघांनी पाठीमागून कारची काच फोडून 21 लाख 50 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग चोरी करून नेली होती.

त्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत चोरट्यांचे वर्णन जाणून घेतले होते. त्यावरून चोरटे गुजरातच्या दिशेने गेल्याचे प्रथमदर्शी अंदाज घेण्यात आला.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकमधील पथकाने चोरट्यांचा माग काढत थेट गुजरात गाठले. येथील अहमदाबाद येथे चोरटे असलायचे समजले. त्यानंतर दहा दिवसांनी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून १२ लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!