Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुथुट फायनान्स दरोडा प्रकरण : आशेवाडीनजीक सापडल्या तीन पल्सर; पोलीस तपास सुरु

Share

नाशिक | प्रतिनिधी

आशेवाडी रामशेज शिवारातील पेठ रोडलगत असलेल्या जाधव वस्तीजवळ  तीन अज्ञात पल्सर २२० सीसीच्या दुचाकी मिळून आल्या आहेत. या गाड्या कालच्या उंटवाडी येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घातलेल्या दरोड्याच्या प्रयत्नात वापरल्या गेल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास या दुचाकी मिळून आल्या. यानंतर घटनास्थळी पोलीस पोलीस दाखल झाले असून तपासकार्याने गती घेतली आहे.

दरोड्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत तांत्रित अभियंता असलेल्या एका कर्मचाऱ्याचा गोळी लागून मृत्यू झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेत शहराच्या सीमा सील केल्या होत्या. मात्र, दुसरा दिवस उजाडूनही नाशिक पोलिसांच्या हाताला काहीही लागले नव्हते. सकाळी अज्ञात दुचाकी मिळून आल्याने तपास गती घेण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!