Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारास भरला दम; जीवे ठार मारण्याची धमकी

Share

इंदिरानगर | वार्ताहर

2009 मध्ये झालेल्या पोलिस कर्मचारी बिडवे हत्याप्रकरणी साक्षीदारास हॉटेल एक्सप्रेस इंन जवळ दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार तरुणांनी दुचाकीआडवी लावत प्रत्यक्षदर्शी साक्षीदारास ठार मारण्याची धमकी दिली त्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत पिंगळे (वय 33, रा. गोपाळ सोसायटी जेलरोड) हे दि 10 रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीने कामावर जात असताना हॉटेल एक्सप्रेस इन् जवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी तरुणांनी दुचाकी आडवी लावत तू गुन्ह्यात साक्ष दिली तर तुला जीवे ठार मारू असा दम दिला.

सदरचे तरुणांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने चेहरा व्यवस्थित त्यांना दिसला नाही असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश भामरे करीत आहेत.

2009 मध्ये जेलरोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना बीट मार्शल पोकाँ बिडवे व पोना शिंदे यांच्यावर पवन पवार व त्यांचे साथीदार यांनी हल्ला केला होता.

या घटनेबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 358/09 भादवी कलम 302, 307, प्रमाणे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यातील फिर्यादी पिंगळे हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. पवन पवार व त्यांचे हस्तक यांनी साक्ष देऊ नये म्हणून हे कृत्य केले असावे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!