Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नरमध्ये जिल्ह्यातील तिहेरी तलाकचा पहिला गुन्हा दाखल

Share

सिन्नर | वार्ताहर

तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर सिन्नर तालुक्यात जिल्ह्यातील पहिला तिहेरी तलाकचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुस्लीम महिलांचे विवाहाबाबतच्या हक्कांचे संरक्षण कायदा २०१९ मधील कलम ४ प्रमाणे संगमनेर तालुक्यातील कुरण येथील पती, सासू व सासऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, समीना बिलाल शेख वय 36 रा. उस्मानपुरा चौक, कुरण, ता. संगमनेर हल्ली राहणार सरदवाडी, सिन्नर या विवाहितेने सिन्नर पोलीस ठाण्यात पती बिलाल निसार शेख, सासरे निसार फकीर महंमद शेख, सासू  निसार शेख सर्व राहणार कुरण ता. संगमनेर यांच्याविरोधात शारीरिक छळ व बेकायदेशीर तलाक दिल्या प्रकरणी तक्रार दाखल केली.

जून 1999 पासून  ते  ऑगस्ट 2019 या कालावधीत सासरी आपला शारीरिक व मानसिक छळ करून माहेरून पैसे आणण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती असे समीना यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पति बिलाल याने “मै कुराण पे हाथ रख के अल्लाह को गवाह मानकर तुझे तलाक देता हु” असे म्हणून तिला तीन वेळा तलाक-तलाक असे शब्द म्हणत  बेकायदेशीररित्या तलाक दिल्याप्रकरणी  हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आर बी रसेडे याप्रकरणी तपास करीत आहेत.तिहेरी  तलाक विरोधातला जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा ठरला आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!