Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : मुथूट गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधार अटकेत; पाच संशयित अद्याप फरारच 

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमध्ये १४ जून रोजी झालेल्या मुथूट गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधारास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.  जितेंद्र विजय बहादूर सिंग (रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे या संशयिताचे नाव असून तो कुख्यात गुंड आहे. त्यास गुजरात मधील सुरत येथून ताब्यात घेण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. लवकरच इतर संशयित जेरबंद होतील अशी माहिती शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुथूट फायनान्स गोळीबारात तांत्रिक अभियंता असलेल्या संजू सॅम्युअल्स चा दरोडेखोरांना प्रतिकार करत असताना गोळी लागून मृत्यू झाला होता. त्याच्या शौर्यामुळेच  एकही ग्राम सोन्याची लूट झाली नाही किंवा रोकडही चोरी झाली नसल्या चे पाटील यांनी सांगितले.

पप्पू उर्फ अनुज साहू, आकाश विजय बहाद्दूर सिंग राजपूत, परमिंदर सिंग, सुभाष गौर आणि गुरु (पूर्ण नाव माहित नाही) या संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.

नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद

गुन्ह्यातील सर्व संशयित बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल राज्यातील आहेत. सर्व संशयितांना लवकरच अटक करून नेमका कट कुठे शिजला, नाशिकशी या घटनेचा काय संबंध आहे याबाबत माहिती मिळेल. नाशिक गुन्हे शाखेकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुख्य सूत्रधार ताब्यात घेण्यात आले.

पाच ते सात मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. सीमा सील करण्यात आला. सतर्क नाकाबंदी केली होती. तीन मोटारसायकली दिंडोरी जवळ सापडल्या. नंबर बोगस, चेसी नंबर खोदलेले होते. त्यामुळे तपास करणे मोठे आव्हान होते.

फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली. बजाज कंपनीची मदत घेतली. तिथून डिलरकडे सुरत मध्ये पोहोचले. तिथून वाहन कसे कसे विक्री झाले याबाबत माहिती मिळवली.

मुख्य सूत्रधार जितेंद्र विजय बहादूर सिंग राजपूत ला मोटारसायकल दिली होती.  त्यानंतर सुरत मध्ये राजपूत घरी छापा टाकला होता. दुसरी मोटारसायकल तिथूनच ताब्यात घेतली.

तर तिसरी मोटारसायकल  नाशिकचा सुभाष गौर याच्याकडची असल्याचे निदर्शनास आले. तो नाशिकमधील अंबड येथे सिक्युरिटी कंपनीत काम करतो. घटना घडल्याच्या दिवशी त्याने उत्तर प्रदेशात मुली आणि पत्नीला पाठवले होते.

फेब्रुवारी १९ ला कट रचण्यात आला. मे मध्ये ते सुरत येथे आले. सुभाष गौर याने आधीच घटनास्थळाची रेकी केलेली होती. सुभाष गौर यांच्याकडेच संशयित नाशिकमध्ये राहत होते अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!