Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : जालिंदर उगलमूगले खून प्रकरणातील पहिलाच साक्षीदार फितूर

Share

पंचवटी | वार्ताहर

पंचवटीतील संजयनगर परिसरातील ज्वाल्या उर्फ जालिंदर उगलमूगले याची मे २०१७ मध्ये हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, याप्रकरणी भाजपा नगरसेवकासह सात संशयितांन विरोधात अपहरण आणि खून कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आजमितीस या प्रकरणातील ५ संशयित जामिनावर बाहेर असताना दोनच दिवसापूर्वी ज्वाल्याच्या खुन खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून शासकीय पंच फितूर झाल्याने पंचवटी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

ज्वाल्या उर्फ जालिंदर अंबादास उगलमूगले (वय.२३, रा.संजयनगर, पंचवटी) हा दि. १ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेला असता पुन्हा परतला नव्हता.

यानंतर त्याच्या घरच्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करीत ज्वाल्या याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी अनेकदा पाठपुरावा करून देखील ज्वाल्याचा शोध काहिकेल्या लागत नव्हता.

दरम्यानच्या काळात पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी दिनेश बर्डेकर यांची नियुक्ती झाली. यावेळी जालिंदर याच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेत आपली कथा व्यक्त केली.

यावेळी गुन्हे पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आदींनी याप्रकरणी लक्ष केंद्रित केले. दरम्यान मे २०१७ मध्ये पंचवटीतील पाथरवट लेनमध्ये पूर्ववैमणस्यातून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना झाली.

याघटनेचा तपास सुरू असताना जालिंदर याच्या खुनाला वाचा फुटली. त्याचवेळी भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी, अविनाश कौलकर, रोहित कडाळे, राकेश कोष्टी, शाम महाजन, कुंदन परदेशी, गोपाल गोसावी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यानच्या काळात ७ संशयितांपैकी ५ जण जामिनावर बाहेर असून घटनेचा दोन वर्षानंतर याप्रकरणाचा न्यायालयात खटला सुरू झाला आहे.

यात जवळपास ४८ साक्षीदार आणि पंच आहे. यात महावितरण पंचवटी विभागात कार्यरत असलेले अशोक गोपाळ बदादे हे देखील शासकीय पंच म्हणून आहेत.

मात्र दोनच दिवसापूर्वी त्यांची साक्ष नोंदविण्यात आली असता त्यांनी आपली साक्ष फिरवल्याने पोलिसांनी बदादे यांना फितूर घोषित केले असून याबाबत त्यांच्या कार्यलयाशी पत्र व्यवहार करून बदादे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


महावितरण पंचवटी विभागात कार्यरत असलेले अशोक बदादे जालिंदर खून खटल्यातील शासकीय पंच असून त्यानी साक्ष असतांना ते सरकारी कर्मचारी असून देखील साक्ष फिरविल्याने त्यांना ” फितूर” म्हणून घोषित केले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत कार्यलयाशी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यापुढेही सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभणाला बळी पडून मा. न्यायालयात साक्ष फिरविल्यास अशीच कठोर कारवाई केली जाईल.

के.डी. पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!