Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : डीजे अत्याचार प्रकरण : मुख्य संशयित संदेश काजळेसह इतर दोघे...

Video : डीजे अत्याचार प्रकरण : मुख्य संशयित संदेश काजळेसह इतर दोघे गजाआड; नंदूरबार जिल्ह्यात ‘स्थागुशा’ची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी

दरी मातोरी येथील डीजे अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या संदेश काजळे यास नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर येथून स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले.

- Advertisement -

तालुक्यातील दरी मातोरी येथील फार्महाऊसवर आयोजित केलेल्या सराईत गुन्हेगाराच्या वाढदिवासाच्या पार्टीत डीजे सिस्टीम व आवाज चांगला नाही, अशी कुरापत काढून सराईतांनी दोन डीजेवादक युवकांवर रात्रभर अनैसर्गिक अत्याचार केले होते. या टोळक्यापैकी फार्महाऊसचा मालक निखिल पवार, प्रीतेश काजळे, संदेश वाघ, अभिषेक शिरसाट, रोहित डोळस, संदीप भवाळकर या सहा संशयितांना ग्रामीण पोलीस दलाने शनिवारी अटक केली होती.

या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. आहे. तर पोलिसांनी रविवारी प्रकाश वाघ यास अटक केली होती. त्यासही पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी आठवा संशयित असलेल्या ओंकार ऊर्फ सिंधू राजू मथुरे (26, रा. नवीन नाशिक) यास अटक केली होती.
तर मुख्य सूत्रधार संदेश काजळे याच्या शोधात पोलिसांनी पथके रवाना केली होती.

पथके धुळे, नंदुरबार जळगाव परिसरात काजळे याचा शोध घेत होते. दरम्यान, या पथकातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नावापुरहून सुरतकडे जाणाऱ्या महामार्गावर काजळे याच्यासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. भूषण सुर्वे व रवींद्र सूर्यवंशी अशी या संशयितांची नावे आहेत. तिघांना पुढील कारवाईसाठी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या