Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

चक्कर येऊन पडल्याने दोघांचा मृत्यू

Share

नाशिक । पाथर्डी फाटा आणि मालधक्का भागात चक्कर येवून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

किरण शिरसाठ हे सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास मालधक्का भागात चक्कर येवून पडले होते. मुलगा गणेश शिरसाठ यांनी त्यांना तत्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषित केले.याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अधिक तपास हवालदार बोईर करीत आहेत. संतोष रावजी पाटील (62 रा.एस.प्राईड,विक्रीकर भवन) व किरण बाळासाहेब शिरसाठ (56) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. संतोष पाटील सोमवारी (दि.18) सायंकाळी आपल्या राहत्या घरात चक्कर येवून पडले होते. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने कुटूंबियांनी तत्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!