Type to search

नाशिक : सुवर्णपदक विजेत्या रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला; स्पर्धेला मुकणार

Breaking News Featured आवर्जून वाचाच क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : सुवर्णपदक विजेत्या रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला; स्पर्धेला मुकणार

Share

नाशिक | प्रतिनिधी

एकीकडे हेल्मेट सक्तीची मोहीम सुरु असतानाच शहरातील गुन्हेगारी मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीये. काल रात्री एका राज्यस्तरीय सुवर्णपदक आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूवर चोरट्यांनी हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याह धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील वर्दळीच्या असलेल्या बोट क्लब परिसरात घडला.

निखिल भाऊसाहेब सोनवणे असे या खेळाडूचे नाव असून लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा तो खेळाडू आहे. निखील पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत आहे.

तो रोज सकाळ व सायंकाळी बापु पुलाजवळ असलेल्या व वॉटर एज स्पोर्ट्स क्लबवर रोइंग खेळाचा सराव करण्यासाठी यायचा.

काल रात्रीच्या सुमारास सराव आटोपून घरी परतत असताना त्याच्याकडून मोबाईल रोख रक्कम लुटण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयितांनी त्याला मारहाण केली. मारहाणीत चाकूनेदेखील भोसकत त्याला गंभीर जखमी केले. या निखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

निखिल १७ ते १९ मे दरम्यान पुणे येथील नाशिक फाट्या जवळ असलेल्या आर्मी बोटींग क्लब येथे राज्यस्तरी रोईंग स्पर्धेची तयारी करत होता.

त्याच्यावर अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तो या स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे त्याचे एक वर्षाचे नुकसानदेखील होणार आहे.

निखिलने याआधी या स्पर्धेत एक सुवर्णपदक, एक रौप्यपदक जिंकलेले आहे. नाशिक पोलिसांनी दोन दिवसांपासून विनाहेल्मेट धारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मात्र, शहरातील काही भागात आजही गुन्हेगारांचा वास्तव्य आहे. दिवसाढवळ्या लुटमार होत आहे. यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील विद्यार्थ्यांसह सुजाण नागरिक करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!