Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक जिल्हा आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांच्याविरोधात दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

डेकाटे यांनी आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याची पगारवाढ करून देण्यासाठी तक्रारदाराकडून त्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत आरोग्य अधिकारी डेकाटे यांच्यावर सापळा रचला होता.

परंतु, याची कुणकुण लागल्याने डेकाटे यांनी रक्कम त्यावेळी स्वीकारली नव्हती. मात्र, त्यांनी सदर रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, डेकाटे हे गेली चार दिवसांपासून फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपाधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!