Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

भावी महिला फौजदारास साठ हजारांचा ऑनलाईन गंडा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

२५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत एका भामट्याने महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षकास 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रशिक्षणार्थी महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार राजरोसपणे घडत असून याबाबत काळाजी घेण्याचे आवाहन पोलीस वेळोवेळी सामान्य नागरिकांना करत आहेत. परंतु  प्रशिक्षणार्थी  महिला पोलीस उपनिरीक्षकास गंडवले जाते तेव्हा सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहावे अशी अवस्था सध्या नाशिकची झाली आहे.

महिला प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाच्या फिर्यादीनुसार तिला 13 ते 14 जून दरम्यान छत्तीसगढ येथून अनंत कुमार गुप्ता याने वारंवार फोन केले. तसेच महिलेस 25 लाख रुपयांची लॉटरी लागली असल्याचे सांगत भामट्याने आमीष दाखवले.

लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी जी. एस. टी व इतर करापोटी ऑनलाइन रक्कम भरण्यास प्रशिक्षणार्थी महिला अधिकार्‍यास सांगितली. त्यानुसार महिलेने संशयितांने सांगितल्यानुसार ऑनलाइनरित्या 61 हजार रुपये संशयिताच्या खात्यावर जमा केले.

मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने गंगापूर पोलीस ठाणे गाठून संशयिताविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस तपास करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!