Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Share

नाशिक | प्रातिनिधी

गिरणारे-वाघेरा रस्त्यावर अवैध विदेशी मद्याची वाहतूक पकडून जवळपास साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पिक अप वाहनासह चालकास अटक करण्यात आली आहे.

आज सकाळी गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना अवैध मद्याची वाहतूक केली जात  असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादनकडून संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये मागच्या बाजूला आंब्यांचे कॅरेट आढळून आले.

यानंतर सर्व कॅरेट चेक केले असता यामध्ये वेगवेळ्या कंपनीचे महागडे मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यामध्ये जवळपास ९९ बॉक्स आढळून आले असून १३ लाख ३४ हजार २३४ रुपये एकूण मुद्देमालाची किंमत असल्याची माहिती राज्य उत्पादनकडून देण्यात आली.

सर्व मद्य दादरा आणि नगर हवेली येथील आहे. गाडी गुजरात पासिंगची असून महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हा माल जात होता याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग तपास करत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!