Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मिरजकर सराफ प्रकरणातील हर्षल नाईक फरार घोषीत

Share

नाशिक । प्रतिनिधी
आर्थिक गुंतवूणक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून शेकडो गुंतवूणकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या कंपनीचा संचालक व अद्याप पोलीसांच्या हाती न लागलेला हर्षल नाईक यास अखेर न्यायालयाने फरार घोषीत केले आहे.

जुलै 2018 मध्ये हा घोटाळा बाहेर आला होता. मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) जून 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी जवळपास तीन महिने बर्‍याच घडामोडी घडल्या. 25 हजार 439 ग्रॅम सोने आणि 25 कोटी रुपयांहून अधिक रकमेची या प्रकरणात फसवणूक झाली आहे.

या गुन्ह्यामधील फरार संशयितांपैकी आशितोष चंद्रात्रे यास पोलिसांनी अटक केली तर उर्वरीत संशयित महेश मिरजकर, सुरेश भास्कर, भरत सोनवणे, विशाल नगरकर, विजयदिप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व किर्ती हर्षल नाईक यांनी यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता.

मात्र, न्यायाधीश देशमुख यांनी त्यांना 15 कोटी रुपये कोर्टात भरण्याचे आदेश 30 ऑक्टोबर रोजी दिले होते. जामिनासाठी कोर्टात अर्ज करणार्‍या या संशयित अर्जदारांना कोर्टाने ही महत्त्वपूर्ण अट टाकली. मात्र, संशयितांनी पैसे भरले नसल्याने ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.

तर सर्वाचा मुख्य सुत्रधारर हर्षल नाईक गुन्हा उघडकीस येण्याचा पुर्वीपासून गायब आहे. मागील वर्षाच्या सुरुवातीलाच परभणी जिल्ह्यात त्याचा शेवटचा ठावठिकाणा आढळला होता. मुख्य सूत्रधारच सापडत नसल्याने या गुन्ह्यात तपास पथकाच्या हाती फारसे काही लागलेले नाही.

त्यामुळे गुंतवणुकरदारांमध्येसुद्धा चिंतेचे वातावरण आहे. त्याचा शोध घेऊन थकलेल्या पोलीस प्रशासाने न्यायालयात अहवाल सादर केला होता. त्यानुसार न्यायालयाने आज हर्षला नाईक यास फरार घोषीत करण्याबाबतची नोटीस जाहिर केली आहे.

परभणी ’लास्ट लोकेशन’
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हर्षल नाईक गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फरारी झाला आहे. त्यावेळी त्याचे शेवटचे लोकेशन परभणी जिल्ह्यात सापडले होते. त्यानंतर तो कोठे आहे याची जराशीही माहिती आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेली नाही. मुख्य सूत्रधारच बेपत्ता असल्याने या गुन्ह्याच्या तपासावरदेखील परिणाम झाला आहे.

हर्षल नाईकबाबत पोलिसांसमोरच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गुतंवणूकदारांच्या पैशांचे काय झाले आणि काही मालमत्ता असेल तर ती कोठे आहे, हे फक्त हर्षल नाईक सांगू शकतो, असा कयास आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!