Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्हा रुग्णालयातून संशयित आरोपी फरार

Share

नाशिक : अल्पवयीन मुलीचे या[हरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताने जिल्हा रुग्णालयातून पोलिसांची नजर चुकवून पळ काढल्याचा प्रकार आज सायंकाळी घडला.

अशोक दत्ता पारवे (२४) असे संशयिताचे नाव आहे. त्यावर बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, (पॉस्को) अंतर्गत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आज सांयकाळी त्यास वैद्यकीय तपासणीसाठी आणले असतांना साडे पाच वाजेच्या सुमारास दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला. जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील उंच भिंतीवरून उडी मारून शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळून पोबारा केला.

या प्रकरणी पोलिसांनी सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असून उशिरापर्यंत त्याचा तपास लागला नव्हता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!