Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : उमेदवाराचा प्रचार का करता? असे म्हणत टोळक्याची मारहाण, पाच लाखांचा ऐवज लुटला

Share

नाशिक | प्रतिनिधी

निवडणुक प्रचाराच्या कारणातून टोळक्याने घरात घुसून कुटूंबियास धक्काबुक्की करत मारहाण करून रोकडसह दागिणे पळविल्याची घटना वडाळारोडवरील काझीनगर भागात घडली.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनूस तांबोळी,फारूख तांबोळी,इम्रान तांबोळी,एजाज तांबोळी,रिजवान तांबोळी,शकिल तांबोळी,दानिश तांबोळी,इम्रान तांबोळी,इरफान तांबोळी,लड्या तांबोळी अन्य २० ते २५ जण अशी संशयितांची आहेत.

याप्रकरणी तनवीर जब्बार खान (४२ रा.नसिम व्हिला,मेट्रो हॉस्पिटल जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

टोळक्याने खान यांच्या ऑफिसमध्ये अनधिकृत प्रवेश करून तुम्ही विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवाराचा प्रचार का करता? अशी विचारणा करीत थेट शिवीगाळ व कुटूंबियास धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. धक्काबुक्कीचे पर्यावसान हाणामारीत झाले.

याच वेळी मारहाण करणाऱ्या टोळक्याने टेबलावर पडलेली रोकड आणि दागिणे असा सुमारे ४ लाख ९० हजाराचा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याचे समजते.

दरम्यान, भाजप उमेदवाराने तांबोळी समाजच्या व्यक्तीकडे हे पैसे दिल्याचे समजते. तर दुसऱ्या टोळक्याने समाजाच्या नावाने पैसे खाल्ल्याचा आरोप करत हाणामारी केल्याचे समजते. या घटनेचा अधिक तपास सोमनाथ गेंगजे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!