Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लाखो रुपयांचा अवैध गुटखा पकडला; नाशिक शहर वाहतूक पोलिसांची कामगिरी

Share

नाशिक | प्रतिनिधी

मारुती कारमधून वाहतूक होत असलेला लाखो रुपयांचा गुटखा नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या युनिट एकने आज पकडला. वाहन तपासणी सुरु असताना संशयास्पदरित्या आढळून आलेल्या वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या गाडीत गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या असून मुद्देमालाची किंमत अद्याप समजली नाही. घटनास्थळी अन्न व औषध प्रशासन आणि शहर पोलिसांकडून पंचनामा सुरु आहे.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी वाहनासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!