Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी

Share

नाशिक । प्रतिनिधी

रिक्षा प्रवासात रिक्षाचालकाने प्रवासी तरूणीचा विनयभंग केल्यावर अब्रु वाचविण्यासाठी तिने धावत्या रिक्षातून उडी मारल्याने ही मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

मुलीने रिक्षातून उडी मारल्यानंतर ती जखमी झाली. याठिकाणी नागरिकांची गर्दी झाल्याने संशयित रिक्षाचालकाला पकडून त्यास नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

घटनास्थळी पोलिस दाखल झाल्याने संशयित आरोपी रिक्षाचालक याला त्वरित पोलिसांनी अटक केली असून त्याचीे रिक्षा क्र (एम एच 15 Ak 66 85 )जमा केली आहे.

अधिक माहिती अशी की, घटनेतील पिडीता (दि. 19) जून रोजी तीन वाजता संशयित रिक्षाचालक रवि शंकर गोफणे (वय-22, रा. गौतमनगर, रामायण हॉटेल मागे, गरवारे पॉइर्ंट, अंबड, नाशिक) याच्या रिक्षातून गरवारे पॉइंटशेजारील आंगण हॉटेल, महाराष्ट्र बँकेसमोर्रोन सर्व्हिस रोडवरून जात असतांना रिक्षाचालक गोफणे याने पिडीतेला ‘तु, मुझे अच्छी लगती है.’ असे म्हणुन चालु रिक्षात तिचा उजवा हात पकडुन विनयभंग केला.

पिडीतेने त्याला जाब विचारत गोफणे याला रिक्षा थांबविण्यास सांंगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबविली नाही. त्यामुळे भेदरलेल्या पिडीतेने चालु रिक्षातून उडी मारली.

या घटनेत तिच्या चेहर्‍याला व उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. या गुन्ह्याचा तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक मोरे करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!