सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेत नाशिकचा मुर्तझा चमकला; नाबाद १०२ धावा

0
नाशिक | बीसीसीआयच्या सी के नायडू 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्ध्येच्या दिल्ली विरुद्ध सामन्यात नाशिकचा क्रिकेट विश्वातला उगवता तारा असणारा मुर्तझाने १०२ धावांची नाबाद खेळी केली.

मुर्तझा ट्रंकवाला मुळचा नाशिकचा असून क्रिकेटविश्वात नाशिकचा उगवता तारा म्हणून त्याला ओळखले जाते. २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात त्याची निवड झाल्यानंतर त्याने आपली कामगिरी उत्कृष्ट कशी होईल यावर भर दिला असून रणजी असो किंवा सौराष्ट्र संघ त्याने आपला ठसा उमटवला आहे.

मुर्तझा हा मधल्या फळीतील भरवशाचा उजव्या हाताचा फलंदाज म्हणून अनेक वर्षांपासून विविध स्तरावरील क्रिकेट सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आला आहे.

मुर्तझा ट्रंकवालाने महाराष्ट्राकडून खेळतांना रणजी पदार्पणातच शतक

झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. मुतर्झा हा रणजी संघात पदार्पणातच शतक ठोकणारा नाशिकचा पहिला क्रिकेटपटूदेखील त्यावेळी ठरला.

LEAVE A REPLY

*