नाशिकच्या मुर्तुझा ट्रंकवालाची महाराष्ट्राच्या रणजी संघात पुन्हा निवड

0
नाशिक | नाशिकचा धडाडीचा सलामी फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला याची महाराष्ट्राच्या रणजी संघात पुन्हा एकदा निवड झाली आहे. येत्या ९ उद्यापासून रेल्वे विरुद्ध पुणे येथे रणजी सामना होणार आहे. यात मुर्तझा खेळताना दिसणार आहे.

गेल्या वर्षी मुर्तुझाने बीसीसीआयच्या 23 वर्षाखालील सीके नायडू स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी केली होती. यात त्याने एक शतक व एक द्विशतक झळकावले होते.

तसेच गेल्या वर्षी रणजी प्रदार्पणातच त्याने शतक झळकावले होते. तेव्हापासून मुर्तझाने आपली कामगिरीत सातत्य राखले होते.

यावर्षी सी के नायडू ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली विरुद्ध शतक झळकावले. तसेच परवाच विदर्भ संघ विरुद्ध महाराष्ट्र संघाने विजय मिळविला. त्या सामन्यातही मुर्तुझाने नाबाद ४९ धावा कुटल्या होत्या.

मुर्तुझाच्या नियमित सुरु असलेल्या चांगल्या फॉर्ममुळे त्याची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. त्याच्या निवडीमुळे नाशिककरांची मान क्रिकेटमध्ये उंचावली आहे. मुर्तझा ला लवकरच टीम इंडियामध्ये बघण्याची आशा मात्र नाशिकरांना लागली आहे.

मुर्तझाचे पूर्ण न मुर्तझा शाबीर ट्रंकवाला असे आहे. त्याचा जन्म बारामतीमध्ये झाला असला तरी मुळचा तो नाशिकचा आहे. २० जून १९९६ साली त्याचा जन्म झाला.
मुर्तझाची आतापर्यंत महाराष्ट्र, महाराष्ट्र अंडर १६, महाराष्ट्र अंडर १९, त्यानंतर महाराष्ट्र अंडर २२ या संघांमध्ये निवड झाली आहे. मुर्तझा उजव्या हाताचा सलामीचा किंवा क्रमांक तीनचा स्पोटक फलंदाज आहे.
त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अवघ्या चार सामन्यात २२३ धावांची मजल गाठली आहे. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. 
Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St
First-class 4 6 0 223 117 37.16 463 48.16 1 1 39 0 1 0

 

गेल्या आठवड्यात नाशिकच्या सत्यजित बच्छावची रणजी संघात निवड झाली होती.  त्यानंतर पुन्हा एकदा मुर्तझाचीही निवड रणजीत झाली असल्याने यंदाच्या रणजी सामन्यांत नाशिकचे दोन चेहरे आपले नशीब अजमावणार आहेत.

या दोन्ही खेळाडूंना नाशिकचे क्रिकेटरसिक आता रोल मॉडेलच्या रुपात पाहत असून त्यांच्या रणजीतील कामगिरीकडे नाशिकसह सर्वांचेच लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*