Type to search

Breaking News क्रीडा ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : असा असावा क्रिकेटचा कर्णधार…

Share

न्यू जर्सी : क्रिकेट या खेळाने आज जगभरात प्रचंड प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. क्रिकेट या खेळातून चाहत्यांना आनंद , मनोरंजन , उत्साह यासारख्या अनेक गोष्टींचा आनंद लुटण्याची संधी मिळते. क्रिकेट हा खेळ एकूण २ संघांदरम्यान खेळला जातो. प्रत्येक संघात एकूण ११ खेळाडू असतात. या संघाचा प्रमुख हा संघाचा लीडर असतो. त्यालाच कॅप्टन असे म्हणतात.

इंग्रजीत त्याला स्किपर असे म्हणतात. दुलीप करंडक , रणजी करंडक , आयपीएल , एकदिवसीय सामने , कसोटी सामने इत्यादी , प्रमुख स्पर्धा खेळवल्या जातात . कसोटी सामने हे ९० षटकांचे , एकदिवसीय सामने ५० तर ट्वेन्टी २० सामने हा एक लोकप्रिय प्रकार आहे. कर्णधार म्हणून काम करताना त्याच्याकडे उत्तम नेतृवंगुण , धाडस , चिकाटी कुशलता हे गुण असावे लागतात.

कसोटी सामन्यांमध्ये एकूण ५ दिवस असतात एका दिवसाला ९० षटके एकूण ३ सत्र प्रत्येक सत्रात ३० षटके या सामन्यांमध्ये कर्णधार आपल्या गोलंदाजाला कितीही षटके गोलंदाजी करवू शकतो. एकदिवसीय लढतींमध्ये ५० षटके असतात. यात कर्णधार प्रत्येक गोलंदाजला एकूण १० षटके गोलंदाजी करवू शकतो. समजा एखाद्या सामन्यात एका गोलंदाजसह कमी उतरला तर, तो आपल्या संघातील एखाद्या फलंदाजाला पर्यायी गोलंदाज म्हणून वापरू शकतो. २० षटकांच्या सामन्यात एकूण ५ गोलंदाज एकूण ४ षटके टाकू शकतात.

कर्णधाराला अडचणीत सहकार्य करण्यासाठी उपकर्णधार असतो. नियमित कर्णधार दुखापतीमुळे सामन्याला मुकणार असेल तर, उपकर्णधार कर्णधार म्हणून काम पाहतो. समजा विश्वकरंडक किंवा , देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा असेल तर संघनिवड समितीसोबत आयोजित बैठकीत प्रशिक्षक , कर्णधार , उपकर्णधार ही सर्व मंडळी उपस्थीत राहतात. विश्वकरंडकसाख्या स्पर्धेत संघ पराभूत झाल्यास सर्वप्रथम संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात येत असते.

यात कर्णधाराला प्रश्न विचारण्यात येत असतात. कर्णधार हा आपल्या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू असतो. समजा एखाद्या खेळाडूला आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करण्यात अपयश आले तर , त्याला पाठिंबा देऊन त्याला आणखी एक संधी देऊन त्याचा आत्मविश्वास द्विगुणित करणे हे कर्णधाराचे काम असते. कर्णधाराला आपल्या संघातील सर्व खेळाडूंसोबत योग्य संभाषण साधता यायला हवे. त्याच्याकडे क्रिकेटविषयी ज्ञान असायला हवे.

कर्णधाराने सामना चालू असताना अत्यंत शांतपणे सामन्याची सर्व सूत्रे यशस्वीपणे सांभाळायला हवीत. कर्णधाराला फलंदाजीचा क्रम , कोणत्या षटकासाठी कोणता गोलंदाज योग्य आहे. तसेच क्षेत्रक्षणाचे जाळे उभारता येणे आवश्यक आहे. कर्णधाराला योग्य संघाची निवड करता यायला हवी. संघाची निवड करत असताना कर्णधाराने आपल्या संघात ज्या खेळाडूंना स्थान द्यायचे आहे तो खेळाडू आपल्या संघात योग्य आहे की, नाही ते पडताळून पाहणे आवश्यक आहे. शिवाय आपला संघ संतुलित कसा राहील हे तपासून पाहायला हवे.

कर्णधाराच्या काही  महत्वपूर्ण जबाबदाऱ्या
१) नाणेफेकीचा कौल : सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी यजमान संघाचा कर्णधार नाणेफेक हवेत उडवतो. व पाहुण्या संघाचा कर्णधार छापा किंवा काटा यापैकी एक कॉल देतो जो कर्णधार नाणेफेक जिंकतो त्याला निर्णय घ्यायचा असतो. आमचा संघ फलंदाजी स्वीकारणार किंवा गोलंदाजी नाणेफेकीचा कौल हा हवामानावर किंवा खेळपट्टीची व्यवस्थित पाहणी करून निवडायचा असतो.

२) क्षेत्रक्षणाचे जाळे : कर्णधारला क्षेत्रक्षण उभारताना कोणता खेळाडू कोणत्या जागेवर योग्य आहे. हा निर्णय घ्यावा लागतो. गोलंदाज गोलंदाजी करताना कधीकधी संघासाठी महागडा ठरत असेल तर, कर्णधार आपल्या गोलंदाजाशी संवाद साधून आपल्या गोलंदाजाला कश्याप्रकारचे क्षेत्रक्षण हवे आहे. त्याप्रमाणे तो आपल्या संघातील खेळाडूंच्या जागा बदलतो.

३) गोलंदाजी : कर्णधाराला आपल्या संघातील गोलंदाज केव्हा गोलंदाजी करणार हा निर्णय घेणे जरुरीचे असते समजा प्रतिस्स्पर्धी संघातील फलंदाजजोरदार हल्लाबोल करत असेल तर , षटक फेकत असलेल्या गोलंदाजवर तुटून पडत असल्यास कर्णधार आपल्या संघातील एखाद्या खेळाडूला पर्यायी गोलंदाज म्हणून वापरू शकतो.

४) फलंदाजीचा योग्य क्रम ठरवणे : जेव्हा एखादा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल होतो. तत्पूर्वी कर्णधार आपल्या संघातील फलंदाजीचा क्रम निश्चित करतो. जर आपल्या संघातील आघाडीचे फलंदाज अपयशी ठरून स्वस्तात माघारी परातल्यास कर्णधार अचानक फलंदाजीच्या क्रमात काहीसा बदल करतो.

५) डाव घोषित करणे : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर कसोटी सामना सुरु आहे. विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. भारताला पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा काढण्यात यश आले. प्रत्युत्तरात स्टीव स्मिथच्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सर्वबाद १०१ धावा काढल्या आहेत. भारताने पहिल्या डावात २९९ धावांची आघाडी मिळवली आहे व आपला डाव घोषित केला आहे.

-सलिल परांजपे, न्यू जर्सी अमेरिका

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!