Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

क्रेडाईमार्फत शहीद जवानांच्या कुटुंबांना मिळणार ‘२ बीएचके’ची घरे

Share

नाशिक : पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांसाठी विविध ठिकाणाहून मदत जाहीर होत आहे. दरम्यान ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना टू बीएचके घरे देणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठीचे एक पत्रक संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान या संघटनेचे अध्यक्ष जेक्सी शाह यांनी यांनी याबाबत घोषणा केली. त्यांनी सांगितले कि, आमची संघटना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत असून प्रत्येक जवानांच्या कुटुंबाला त्याच्या राहत्या ठिकाणी टू बीएचके फ्लॅट आम्ही देणार आहोत. तसेच आमच्या सर्व सदस्यांतर्फे शहीद जवानांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगामधून सावरण्याची ताकद मिळो हीच प्रार्थना आहे, असंही शाह यांनी सांगितले.

देशातील २३ राज्यामढील जवळपास दोनशे शहरांमध्ये व्यावसायिकांचे गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यामुळे प्रत्येक शहीद जवानांच्या कुटुंबियांना ‘क्रेडाई’ मार्फत तू बीएच के फ्लॅट मिळणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!