Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या सेल्फी

Video : सकारात्मक बदलांचा ठाम ‘विश्वास’; विश्वास नांगरे पाटलांनी उलगडले अंतरंग

Share

नाशिक | प्रतिनिधी 

कायमच शिस्तीच्या बडग्यात वावरणार्‍या, खाकीच्या खाक्यात कायम पाहिल्या जाणार्‍या व्यक्तीची मृदू , संवेदनशील, समवेदना जोपासणारी अशी बाजू ‘देशदूत’शी संवाद साधताना उलगडते, तेव्हा समजतो तो वर्दीमागचा माणुस. आणि हा माणुस जेव्हा विश्वास नांगरे पाटील असतो तेव्हा त्या व्यक्तीमत्वाला कितीतरी पैलू आहेत हे समोर येते.

व्यक्ती कितीही उच्च पद, स्थितीला पोहचली असली तरीही स्वतःकडे अतियश निश्पक्षपणे, सुक्ष्म दृष्टीने एका समीक्षकाच्या भूमिकेतून स्वतःकडे व आपल्या व्यवस्थेकडे बघून समाजात सकारात्मक बदल करण्याचा निश्चिय करून काम करते. हे विश्वास नांगरे पाटलांशी बोलताना जाणवले.

मंगळवार (दि.7) रोजी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी ‘देशदूत परिवाराशी अनौपचारीक गप्पा मारण्यासाठी देशदूत कार्यालयास भेट दिली. यावेळी देशदूतचे संचालक विक्रम सारडा यांनी त्यांचे स्वागत केले. नांगरे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत त्यांच्या व्यक्तीत्वाची हळवी पण तितकीच जबाबदार बाजू सगळ्यांसमोर आली. या चर्चेची झलक खालील प्रमाणे

नाशिक बद्दल …

नाशिक म्हणजे कुसुमाग्रजांचे गाव, त्यांच्या कविंताप्रमाणे, सांस्कृतिक, सौंदर्यप्रधान व अवतीभवती शांतता असणारा गाव असे मनात घेऊन येथे आलो आणि हे सर्व प्रत्यक्षात अनुभवत आहे. तत्कालीन डीआयजी अरविंद इनामदार हे नेहमी कुसुमाग्रजांशी चर्चा करत असत असे एकुण होतो, मला काही तसा योग आला नाही, परंतु त्यांच्या कवितांनी प्रभावित झालो. कवितेतले नाशिक डोक्यात घेऊन आलो आणि लक्षात आले की, येथील एकंदरीत कायदा सुव्यस्थेची परिस्थिती बरी असून कायद्याचे पालन, सन्मान करणारे नागरीक आहेत.

26/11 हल्ल्याकडे आज पाहताना…

या हल्ल्याला 10 वर्ष होत आहेत. या हल्ल्यातील 51 तासांनी माझ्या व्यक्तीमत्वाला अनेक शॉक दिले. यामुळे पुर्वीची मुंबई, मुंबईकर यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुर्ण बदलून गेला. तसेच अधिकारी, शासनाची व लोकांचीही मानसिकता पुर्ण बदलली. अनेक अधिकारी शहिद झाले आणि टिव्हीवर माझेही नाव झळकत होते. मी कुटुंबियांचे फोन या काळात स्विकारले नाहीत. कारण मी कमजोर झालो असतो. परंतु त्यांची अवस्था खूप वाईट होती. या घटनेत मी सर्वप्रंथम हॉटेल ताजमध्ये पोहचलो. धाडस करून अवघ्या 20 मिनीटात अतिरेक्यांना पिस्तोलच्या बळावर प्रत्युतर सुरू केले. जे त्यांना अपेक्षीतही नव्हते यामुळे त्यांना काही काळ एकाच ठिकाणी अडकून ठेवण्यात यशस्वी झालो. पुढे विशेष पथक आल्यानंतर मोठा अनर्थ टाळला. यामुळे आमच्या पथकाला राष्ट्रपती शौर्यपदकही मिळाले. परंतु यापलिकडे परिस्थितीने स्वतःकडे पाहण्याचा वेगळा आयाम दिला, आत्मविश्वास वृद्धिंगत झाला.

* रेव्हपार्टी, युवक आणि मी….

मी तरूण मुलांशी त्यांच्या मोठा भाऊ म्हणून संवाद साधू पहतो. प्रचंड उर्जा असलेल्या या पिढीला मार्गदर्शनाची गरज आहे. असे वाटते. मी स्वतः पोलीस वसाहतीत राहण्याचा अनुभव घेतला असल्याने तेथील मुलांना मुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळावे, खेळ, व्यायामासाठी ग्रीन जीम, अभ्यासाठी अभ्यासिकस उपलब्ध व्हाव्यात असा माझा प्रयत्न असतो. यातून त्यांना शिक्षण व रोजगार मिळावा अशी धडपड असते. तीन मोठ्या रेव्हपार्ट्यांना रेड केल्यानंतर जे युवक त्यात सापडले त्यांना शिक्षा ठोठावण्यापेक्षा समुदेशनाची गरज आहे हे लक्षात आले आणि म्हणून असे कलम लावले की, जणेकरून त्यांना पुनर्वसनासाठी संधी मिळाली. अर्थात नशेचे पदार्थ पुरवणारांवर कठोर कारवाईदेखील केली.

* फिटनेस आणि पोलिसींग …

माझ्या पद्धतीत स्वच्छेने, आंनदाने काम करण्यावर भर दिला जातो म्हणून बदली करताना मी प्रत्येक कर्मचार्‍याशी चर्चा करून त्याला जाणून निर्णय घेतो. हेतू एवढाच कोणालाही काम जबरदस्ती वा शिक्षा वाटू नये. पोलीस ठाण्यांचा अभ्यास करून 5 विभाग केले आहेत. प्रत्येक कामासाठी वयोगटानूसार स्वतंत्र पथके केली आहेत. त्या त्या पोलीस ठाण्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यांना कर्मचारी दिले जात आहेत. प्रत्येकवळी आमच्या बैठक, संमेलनाद्वारे प्रत्यक्ष कर्मचार्‍यांना भेटून आपण त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या जात आहेत. त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पोलीसांच्या निकोप आयुष्यासाठी आहार तज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षीतांकडून मार्गदर्शन घेत वेगळा डायटप्लॅन तयार करण्यात येत आहे. तसेच आरोग्यासाठी रूग्णालयांशी कंत्राट करून अल्पदरात तपासण्या केल्या जात आहेत.

* मुली, महिला आणि सुरक्षितता…

महिला सुरक्षेसाठी घटनास्थळ व अभासी सोशल मिडीयाचे विश्व अशा दोन पातळीवर काम करण्यात येत आहे. आम्ही शहरातील सुमारे 600 असे ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. अशा ठिकाणी निर्भया पथकातील महिला कर्मचारी साध्या वेशात वावरणार असून छुप्या कॅमेराद्वारे लक्ष ठेवणार आहेत. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रिक्षा चालकांची चौकशी सुरू केली आहे. महिला सुरक्षिततेसाठी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले पाहिजे व यातूनच गुन्हेगार समोर येऊ शकतात. महिला सुरक्षेसाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!