Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक पोलीस आयुक्तालयाला मिळाले दोन नवे ‘एसीपी’

Share

नाशिक । प्रतिनिधी

गृह विभागाने गुरुवारी (दि.11) राज्यातील 101 सहायक पोलीस आयुक्त-पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची बदली केली आहे. त्यानुसार नाशिकला दोन सहायक पोलीस आयुक्त मिळाले आहेत. तसेच नाशिक ग्रामीणला एक पोलीस अधिकारी मिळाला आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या विभाग एकचे सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

पुणे येथील सहायक पोलीस आयुक्त समीर नजीर शेख यांच्यासह नवी मुंबई येथील प्रदीप वसंतराव जाधव यांची नाशिक शहरात बदली झाली आहे.

त्याचप्रमाणे गडचिरोली येथील विशेष कृती दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग डी. साळवे यांची मनमाड उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

तसेच मालेगावचे उपविभागीय अधिकारी अजित भागवत पाटील यांची अहमदनगर ग्रामीणला बदली झाली. तर त्यांच्या जागी सोलापूर ग्रामीणचे मंगेश शांताराम चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!