Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक न्यायालयाचा आदर्श; विनयभंग प्रकरणात आरोपीस २० दिवसांत शिक्षा

Share

नाशिक । प्रतिनिधी

विनयभंग प्रकरणी खटला पटलावर आल्यापासून अवघ्या वीस दिवसात नाशिक येथील न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावून आदर्श घालून दिला आहे.

मिकेश कांतीलाल शाह (55, रा. रविराजनगर, अश्विननगर, नवीन नाशिक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.के. गावडे यांनी आरोपी शाह यास 3 महिने कारावास व 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा खटला 19 नोव्हेंबर 2019 ला सुरू झाला होता.

ही घटना 10 ऑक्टोबर 2010 मध्ये घडली होती. 35 वर्षीय उत्तर भारतीय पिडीता आरोपीच्या खालील फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होती. घटनेच्या दिवशी रात्री पिडीता ही पॅसेजमधील विजेचा बल्ब बंद करण्यासाठी गेली असता आरोपी मिकेश शाह याने पिडीतेचा विनयभंग केला होता.

यानंतर पिडीतने पतीसह अंबड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दिली होती. पिडीतेच्या पाठपुराव्यानंतर अखेर आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. परंतु न्यायालयात दाखल असलेल्या हजारो खटल्यांमुळे हा खटला गेली 8 वर्षे विलंबीत पडला होता.

अखेर 19 नोव्हेंबर 2019 ला हा खटला पटावर येताच न्यायालयाने शिघ्र गीतने सुनावणी घेत अवघ्या 20दिवसात या खटल्याचा निला सुनावला. महिला अत्याचाराने देश हादरत असताना विलबांचा कालावधी वगळता नाशिकच्या न्यायालयाने विनयभंग प्रकरणी आरोपीस अल्प कालावधीत शिक्षा देऊन आदर्श घालून दिला आहे.

या खटल्यात आरोपीच्या वकिलांनी आरोपीचे वय व आजार पाहता शिक्षेत सुट देण्याची मागणी केली होती. परंतु सकरकारी वकिल विद्या देवरे – निकम यांनी, महिलांविरूद्धच्या गुन्ह्यात जर आरोपींना सुट दिला तर समाजात चुकीचा संदेश जाऊन महिलांचे मनोधैर्य खच्ची होईल असा युक्तीवाद करत सुट देण्यास कडडून विरोध केला.

अखेर न्यायालयाने साक्षी पुरावे ग्राह्य धरत आरोपीस दोषी ठरवून 3 महिने कारावास व 1 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी एस.एम. देशमुख यांची मदत झाली.

पोलीसांकडून अन्याय

पिडीता ही उत्तर भारतीय असल्याने तसेच शाह याने पोलीसांबरोबर अर्थपुर्ण दबाव टाकल्याने पिडीतेने तक्रार देऊनही अंबड पोलीसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकरणी काही महिन्यांनतर पिडीतने तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्तांनी आदेश देऊनही तत्कालीन ठाणे अंमलदाराने अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

तसेच खोटा पंचनामा तयार केला. पिडीतेने पुन्हा आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तपास अधिकार्‍यास हजार रूपयाचा दंड केला होता. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व अन्यायाला वैतागुन पिडीता आपल्या बिहार येथील मुळ गावी निघुन गेली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!