Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात १०० रुग्ण बाधित आढळले

नाशिक शहरात १०० रुग्ण बाधित आढळले

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात आज दिवसभरात १०० नव्या करोनाबाधित रुग्णांची भर पडली. आजच्या रुग्णसंख्येच्या वाढीमुळे नाशिक शहरातील रुग्णांचा आकडा १९१७ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

शिवाय, आज नाशिक शहरातील एकूण ७ करोनाबाधित रुग्ण दगावले असून मृतांचा आकडा आता ९९ वर पोहोचला आहे. नाशिक शहरात करोनाने थैमान घातले असून प्रशासनासह सर्वच चिंताक्रांत झाले आहेत.

वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिक शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढून २०९ झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत नाशिकमध्ये एकूण ९९५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ८२३ रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये वडाळा रोड येथील ७३ वर्षीय वृद्धाचे निधन झाले आहे. तर चौक मंडई येथील २७ वर्षीय युवकाचे निधन झाले.

यासोबतच मेनरोड येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाले. तर सुभाष रोड येथील ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झाले.

चौक मंडई येथील ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झाले आहे. तर पखाल रोड येथील ८८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे निधन झाले आहे. कोकणीपुरा येथील ४३ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेले आहे.

नाशिक शहरात वृद्ध व्यक्तिंसह आता एका तरूणाचाही मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून लक्षणे असलेल्या व्यक्तींना तात्काळ दवाखान्यात दाखल होऊन उपचार करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या