कोरोना योद्धांना नाशिकच्या शिक्षिकेचा अनोखा सलाम ; ‘थॅक्यू’ कार्ड वाटप

jalgaon-digital
2 Min Read

दर्शना राजपूत यांच्याकडून डॉक्टर,
पोलिसांसह हजारो जणांना ‘थॅक्यू’ कार्ड

नाशिक | प्रतिनिधी

नाशकातील शिक्षिकेने कोरोना योध्दांसाठी अनोखी मोहीम सुरु केली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची जीव वाचवणे व कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून क ाम करणार्‍या डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचार्‍यांना ग्रीटिंग व ऑनलाईन ग्रीटींग पाठवून त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. महिन्याभरात नाशिक व मुंबईतील  शेकडो जणांना त्यांनी हे ग्रीटिंग पाठवले असून अजूनही पाठविणे सुरु आहे .

नाशिक शहरात राहणार्‍या दर्शना रुपेंद्र राजपूत या गेल्या सात वर्षांपासून देशांसाठी काम करणार्‍या सैनिकांना ‘थॅक्यू कार्ड’ पाठवत असतात. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय  सणांना व रक्षाबंधन, होळीला ग्रीटींग कार्ड पाठवून त्यांच्याकडून होत असलेल्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन आभार व्यक्त करतात. या उपक्रमाबद्दल २०१७ मध्ये तत्कालीन  लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या हस्ते त्यांचा गौरवही झाला होता. दर्शना रुपेंद्र राजपूत या ‘स्केचपेन्ट एक्सप्रेस फॉर इंडिया’ या संस्थेच्याही सदस्य आहेत.

देशात कोेरोनाचा प्रसार झाल्यानंतर कोरोना योध्दांच्या कार्याचा सन्मान म्हणून व त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने २३ मार्चपासून कोरोना योध्दांसाठी ग्रिटींग पाठवण्याचे काम  त्यांनी सुरु केले. शाळेतील मुलांकडून ग्रीटींग बनवून त्या डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी, प्रसार माध्यमातील कर्मचारी, स्वच्छता कर्मचार्‍यांना ई-कार्डस पाठवत आहेत.  ग्रीटींगवर ज्या विद्यार्थ्याने कार्ड तयार केले आहे, त्याचे नाव व त्याची शाळा व वर्गही असतो. जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यानी असलेल्या दर्शना राजपूत आकर्षक ग्रीटींग  करण्यासाठी मार्गदर्शनही करत असतात. विविध कार्यालयाकडून त्या लोकांचे मोबाईल क्रमांक घेऊन सकाळी, सकाळी ई-ग्रीटींग पाठवतात. शक्य तेथे प्रत्यक्ष जाऊन ग्रीटींग  देतात. हे देतांना सोशल डिस्टन्सचे पालन करतात.

आतापर्यंत हजारोंच्या संख्येने सैनिकांना ग्रिटींग पाठविले आहेत. ग्रिटींग स्वतः बनवून व इतर शिक्षक व विद्यार्थ्यांकडून बनवून मागवून घेतात. विद्यार्थी आपापल्या कल्पनाशक्तीद्वारे  चित्रांद्वारे ग्रिटींग बनवून ते पाठवितात. याकामी त्यांना पती रुपेंद्र राजपूत व मुली समृध्दी व ऋतिका यांचेही सहकार्य लाभते. यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो  तसेच याद्वारे देशसेवा घडल्याचे समाधानही मिळते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *