Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राज्यातील २५ किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल बांधणार; गडकोटप्रेमींचा विरोध

Share

नाशिक : पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (दि. ०३) रोजी एका नव्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. यानुसार राज्यातील २५ गड किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंडळातर्फे या संबंधित किल्ल्यांची एक यादी सुद्धा तयार करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्राला गड- किल्ल्यांच्या रूपात ऐतिहासिक पर्यटनाचा वारसा लाभला आहे, याचा लाभ घेत पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्याच्या हेतूने मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यातून पर्यटनाला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु या निर्णयाला विरोधी पक्ष व इतिहासप्रेमी मंडळींकडून प्रखर विरोध दर्शवण्यात येत आहे.

तसेच राज्यातील गडकिल्याच्या अस्तित्वासाठी राबणाऱ्या दुर्गसंवर्धन संस्थांनी या निर्णयास विरोध केला असून या निर्णयामुळे गडकिल्ल्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचे दुर्गसंवर्धकांचे म्हणणे आहे.

सरकार गडकिल्ल्यांवर हॉटेल्स उभारणार असेल तर आम्ही दुर्गसंवर्धन संस्था याला कडाडून विरोध करणाऱ आहोत. तसेच हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत निवेदन पाठवणार आहोत.
राम खुर्दळ, शिवकार्य गडकोट संवर्धन

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!