Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

दारुण पराभवानंतर काँग्रेस प्रवक्त्यांची बोलती बंद

Share

नाशिक । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्या सर्व प्रवक्त्यांना पुढील महिनाभर कोणत्याही माध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे. या आदेशामुळे काँग्रेसची भूमिका सातत्याने मांडणार्‍या प्रवक्त्यांची महिनाभर बोलती बंद झाली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सिंह सूरजेवाला यांनी मोदी सरकारच्या शपथविधीच्या दिवशी सकाळी ट्विटरवर काँग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांना माध्यमांशी न बोलण्याचा आदेश काढला. त्या आदेशामुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली. कालपरवापर्यंत प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडणार्‍या प्रवक्त्यांवर एक प्रकारची बंदीच घालण्यात आली आहे. या बंदीमागे अनेक कारणे असल्याची माहिती एका प्रवक्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

काँग्रेसच्या पराभवाचे राष्ट्रीय ते स्थानिक पातळीवर मंथन सुरू आहे. आगामी काळात काँग्रेसमध्ये रचनात्मक फेरबदल होत असून, अनेक नेत्यांच्या जबाबदार्‍याही बदलणार आहेत. त्यामुळे पक्ष एका संक्रमणाच्या स्थितीत आहे. पक्षांतील हे फेरबदल लगेच जनतेसमोर येणार नसून त्याची काळजी घेतली जात आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. चंद्रपुरातील बाळू धानोरकर वगळता कोणत्याही जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आलेला नाही. माजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रत्येक उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे राज्यपातळीवरही या पराभवाचे मंथन सुरू आहे. त्यास्थितीत पक्षाबाबत माध्यमात फारशी चर्चा होणार नाही, त्याची काळजी घेण्यात येत आहे. दरम्यान, पक्षांतर्गत होणारे बदल अथवा कोणतेही निर्णय थेट राज्य अथवा केंद्रीय स्तरावरून अधिकृतरित्या माध्यमांना पोहोचवण्यात येणार आहेत.

रणदीप सिंह सूरजेवाला यांनी काढलेल्या आदेशानंतर लगेचच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून या आदेशाचे पालन करण्यात आले. कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून पुढील एक महिन्यात काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते वा ईतर नेत्यांना माध्यमांनी चर्चेसाठी बोलवू नये, असे स्पष्ट केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!