PhotoGallery : राफेल प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा

0

नाशिक । केंद्राचा राफेल खरेदी घोटाळा, पेट्रोल, डिझेलचे भरमसाठ वाढलेले दर, शेतमालाला भाव नाही, भ्रष्टाचार याविरोधात काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सह नाशिक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार राफेल खरेदीबाबत अनियमितता, पेट्रोल-डिझेलचे भरमसाठ वाढलेले दर, शेतमालाला भाव नाही, तरुणांना रोजगार नाही, भ्रष्टाचार, घोटाळे तसेच शेतकरीविरोधी भूमिका हे केंद्र व राज्य सरकार घेत आहे. देशातील जनतेची लूट भाजप सरकार करत आहे. हे या सरकारचे फार मोठे अपयश आहे. या बाबी लक्षात घेऊन नाशिक जिल्हा (ग्रामीण) व शहर काँग्रेसच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

याप्रसंगी आ. सुधीर तांबे, आ. निर्मला गावित, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, अनिल आहेर, जयप्रकाश छाजेड व नानासाहेब बोरस्ते, डॉ.तुषार शेवाळे, प्रदेश सचिव शाहू खैरे, हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, रमेश काहंडोळे आदीनी सहभागी नोंदविला.

आ. चव्हाण यांचे विविध कार्यक्रम

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे सकाळी 11.30 वाजता गोल्फ क्लब गेस्ट हाऊस येथे आगमन झाले.
. 11:40 ते 12:30 या वेळात एचएएल शिष्टमंडळाची ते भेट घेतली.  12:30 ते 2 पर्यंत नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित राफेल भ्रष्टाचारविरोधातील मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यानंतर उद्योग व व्यापार सेलचे इंडस्ट्री मिट कार्यक्रम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स सभागृह उंटवाडी, नाशिक येथे झाले. सायंकाळी 4.45 ते 7 या वेळात फ्रेंडस् ऑफ डेमोक्रसी राफेलविषयी कार्यक्रम होणार आहे.

LEAVE A REPLY

*