गंगा शुध्दीकरणामागे ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पना

0

मुंबई : गंगा पुनरुज्जिवनाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैश्याची काही कमतरता नाही मात्र आंम्हाला एक कोटी लोकांचे हात या कार्याला लागावे, असे वाटते म्हणून इंडियन मर्चंट चेंबर्स सारख्या संस्थानी पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय जहाजबांधणी आणि रस्ते विकास तथा नदी विकास आणि गंगा शुध्दीकरण प्रकल्पाचे मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
आयएमसीच्या वालचंद हिराचंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, गंगा शुध्दीकरण हे सरकारचे काम नाही तर ही लोकचळवळ बनली आहे, त्यामुळे शाळा महाविद्यालयातून आम्ही आता गंगा मित्र तयार करत आहोत. याकामात किमान एक कोटी जनतेने श्रध्दने योगदान द्यावे आणि हा प्रकल्प लोकांच्या कायम स्मरणात रहावा आणि त्यांना गंगामाईची सेवा केल्याचे समाधान मिळावे असा सरकारचा हेतू आहे.
गडकरी म्हणाले, वेस्ट टू वेल्थ असा हा प्रकल्प असून त्यासाठी पैसा ही अडचण नाही.

त्यामुळे ज्याला जितके आर्थिक योगदान द्यावे असे वाटले असेल त्याचे अगदी 21रूपये देखील स्विकारण्याचे सरकारने ठरविले आहे. गंगा शुध्द करताना त्यातून निघणार्‍या मिथेन आणि कार्बनच्या माध्यमातून बस चालविता येतील तर गंगेत सोडल्या जाणार्‍या विषारी पाण्यावर प्रक्रिया करून ते नागपूरच्या धर्तीवर बाजूच्या 22 वीज प्रकल्पाना विकून कोट्यावधी रूपयांचे उत्पन्न सरकारला मिळणार आहे. गंगा आणि तिच्या उपनद्या मधून जलवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होत असून त्यातूनही म्यानमार आणि बांगलादेश पर्यंत वाहतूक सुरू केली जात आहे. यासाठी 60 वॉटर पोर्ट देखील उभारले जात आहेत असे ते म्हणाले.

गडकरींनी छाप उमटवली : रूपानी
यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष नानीक रूपानी यांनी गडकरी यांच्या सारख्या फार थोड्या मंत्र्याना आपल्या कामातून छाप उमटवता आल्याचे सांगितले. ते म्हणाले की गंगा शुध्दीकरणासारखे कठीण प्रकल्प मोदी यांनी गडकरी यांना देवू केले यामागे हा प्रकल्प तेच पूर्ण करू शकतात असा विश्वास होता असे ते म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष राज नायर म्हणाले, आमच्या एका पिढीने गंगा नदीचे पावित्र्य आणि अस्तित्व धोक्यात आणले तरी आता तिचे पुनरूज्जिवन हाती घेतले असताना त्यात सहभाग नोंदवून आम्ही या देशाच्या जीवनदायीनीचे उपकार फेडता येतील. त्यासाठीच चेंबरने हा कार्यक्रम आयोजित केला असून गंगेचे महत्व आणि तिच्या पुनरुज्जीवनाची गरज लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात योगदान देण्याचे ठरविले आहे.

2020 च्या मार्चपर्यंत शुध्दीकरण
गंगा शुध्दीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर आता ते 70 ते 80 टक्के या मार्चपर्यंत पूर्ण झाले असून येत्या 2020 च्या मार्च पर्यंत संपूर्ण शुध्द आणि पवित्र गंगा आपल्याला नव्या पिढीसाठी देता येणार आहे. या ठिकाणी रिव्हर व्हिलेज ही संकल्पना राबविण्यात येत असून हा प्रकल्प करण्यासाठी मुंबईतील उदयोजकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या शिवाय गंगा प्रवाह जेथे जातो त्या गंगोत्री पासून चारधाम जोडणार्‍या महामार्गाचे जाळे तयार करण्यात आल्याने आता बाराही महिने चारधाम यात्रा करता येणार आहे. या वेळी आयएमसीच्या वतीने या प्रकल्पाला 25 लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

*