Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सअँप क्रमांक जारी; आतापर्यंत २२४ जणांना लाभ

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित खेटा घालणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नुकताच व्हॉट्सअँप क्रमांक जारी केला आहे. या क्रमांकावर व्हॉट्सअँप करून नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांकडे जावे लागणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन लवकरात लवकर त्या सोडविणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

नुकताच त्यांनी युट्युबवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये ही सेवा कशाप्रकारे नागरिकांच्या सोयीची आहे हे पटवून देण्यात आले आहे. ते म्हणाले, अनेक प्रकरणांची शहनिशा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. यामुळे सरकारी काम बाजूला ठेवून या नागरिकांना अनेक गोष्टी सांगाव्या लागतात. यामध्ये सरकारी अधिकारी आणि नागरिक दोघांचाही वेळ खर्च होतो, निष्पन्न काहीच होत नाही.

यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकताच व्हॉट्सअँप क्रमांक 9421954400 सुरु केला आहे. याद्वारे नागरिकांना त्यांच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती तीन दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, आतापर्यंत २२४ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला असून कार्यालयाकडून जवळपास २२३ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या अनोख्या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी तत्पर सेवेमुळे समाधान व्यक्त केले आहे.

या कार्यप्रणालीची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत

1. या प्रणालीमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा निरंतर घेण्याच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान आयुधांचा प्रभावी वापर करण्याची तरतूद आहे. त्यासाठी आढावा घेण्याचे मापदंड निश्चित करण्यात आलेले असून शासनाच्या प्रमुख योजनांचा आढावा क्लाऊड बेस्ड स्प्रेडशीट द्वारे वेळोवेळी घेतला जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना बैठकांसाठी वारंवार मुख्यालयात येण्याची गरज राहिलेली नसून त्यांच्या वेळेचा प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ते सदुपयोग करीत आहेत. त्याच्या परिणामस्वरूप जवळपास सर्वच प्रमुख कार्यक्रमांमध्ये जिल्हा विभागात प्रथम अथवा द्वितीय क्रमांकावर असून राज्यात देखील अग्रेसर आहे.

2. प्रकरणांचा निपटारा वेळेत होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांचा एका छत्राखाली समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये बैठकांची कार्यवृत्ते वेळेवर निर्गमित करणे तसेच त्या कार्यवृंतावर पूर्णत्वाचा अहवाल पुढील बैठकीपूर्वी प्राप्त करून घेणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

3. जिल्हाधिकारी यांचेकडे प्राप्त झालेल्या महत्त्वाच्या प्रकरणांचा पाठपुरावा “एन रेफरन्स” या नावाने दर आठवड्यास केला जात असून त्याचा निपटारा शीघ्रगतीने करणे क्रमप्राप्त आहे.

4. तक्रार निवारणाची अत्यंत प्रभावी कार्यप्रणाली व्हाट्सअप द्वारे राबविण्यात येत असून त्यामुळे नागरिकांचा केवळ आपल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अथवा प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी होत असलेला काल अपव्यय टळत आहे.

5. चांगल्या कामाचा तत्काळ सन्मान आणि विलंब अथवा जाणीवपूर्वक चुका आढळल्यास त्याबाबत शीघ्रतेने शास्ती हे देखील या कार्यप्रणालीचे वैशिष्ट्य आहे. वर्षभरात केली गेलेली चांगली कामे तसेच आढळून आलेल्या चुका यांचा सारासार विचार करूनच अधिकारी व कर्मचारी यांचे अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करण्यात येणार आहे.

गेले सहा महिन्यांमध्ये या कार्यप्रणालीतील बहुतांश बाबींचा अवलंब करण्यात आलेला असून आता एक सप्टेंबरपासून ही कार्यप्रणाली पूर्ण स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात लागू करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!