वाढलेल्या तपमानामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘डीपी रुम’ला आग

0

नाशिक, दि. ४ : आज सायंकाळी ५ च्या सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग लागल्याने घबराट पसरली.

तपमान जास्त असल्याने कार्यालयातील डीपी रुमला आग लागली.

आगीचे वृत्त समजताच येथील कर्मचारी आणि अधिकारी तत्काळ कार्यालयाबाहेर पडले. त्यामुळे कामकाज ठप्प झाले.

अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत दगडी असल्याने आग जास्त पसरली नाही व पुढील अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

*