Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video | नाशिककरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका : जिल्हाधिकारी मांढरे

Share
कोरोना : मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्थांची गुगल स्प्रेडशीटद्वारे नोंदणी : जिल्हाधिकारी सुरज मांढरे  Latest News Nashik Google Spreadsheets Registration for Individuals Organizations That want to Help Says Collector

नाशिक : गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने नाशिककरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असून यामुळे नद्यांना मोठा पूर आला आहे. तसेच पुढील २-३ दिवस अतिपावसाची शक्यता वर्तविली असल्यामुळे नाशिककरांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

दरम्यान गेल्या दोन दिवसांत गंगापूर पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने गोदावरीला महापूर आला होता. यावेळी पुलांवर तसेच नदीकाठी प्रतिबंध करण्यात आला असतांना देखील या ठिकाणी गर्दी केल्याचे दिसून आले. यातच पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदी धोक्याच्या पातळीपर्यंत वाहत आहे.

नदीला आलेला पूर पाहाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुलांवर पोलीस बंदबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी बॅरिकेडस् टाकून वाहनांना पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पुन्हा एकदा व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी रोखण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पोलिसांना तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान यावेळी मांढरे यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!