Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ तालुक्यातील भूस्खलनाची प्रशासनकडून पाहणी; देशदूत वृत्ताची दखल

Share

पेठ : तालुक्यात गत सप्ताहात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने विविध भौगोलिक घटनांनी तालुका हादरला या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी घोटविहीरा येथे भेट देऊन पाहणी केली. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच दै. देशदूतने घोटविहीर येथे जमीन खचल्याची बातमी दिली होती.

दरम्यान गेल्या आठवडाभरात पेठ तालुक्यातील निरगुडे येथे जमीनीतून निघालेल्या बुड बुडयामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पाठोपाठ घोटविहीरा येथे डोंगरास उभी भेग पडल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. तर दोन दिवसाच्या अंतराने लिंगवणे गावाच्या शिवारात जमीन खचल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पेठ तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे काल (दि. १२) जिल्हाधिकारी मांढरे यांनी या ठिकाणी भेट देत लोकांची विचारपूस करत पाहणी केली.

तसेच भूगर्भीय हालचालीचा सूक्ष्म अभ्यास करणारी ‘मेरी’संस्थेचे तांत्रिक अधिकारी बेडवाल यांच्यासह विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, प्रांतधिकारी संदीप आहेर यांनी घटनास्थळी भेट दिली.

अतिवृष्टीने डोंगरात पाणी मुरल्याने तसेच रस्ता बनवितांना डोंगरमध्यावर कापला जात असल्याने डोंगरातील पोकळभागात पाणी मुरत असल्याने असे प्रकार उद्भवत असल्याचे मत नोंदविण्यात आले. या वेळी तहसीलदार हरिश भामरे, पोलिस निरीक्षक शिवाजी बढे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, वनविभागाचे वनधिकारी ठोंबल, मंडळ अधिकारी गोतरणे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!