Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

स्मार्ट सिटी नाशिकच्या कॉलेज रोडला अतिक्रमणाचा विळखा

Share

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये कॉलेज रोडवरील अनेक रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे . राष्ट्रीय फेरीवाला कायद्यानुसार पथारी व्यावसायिक आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यात पालिकेवर काही मर्यादा आहेत . मात्र, पालिकेकडे नोंदणी केलेल्या फेरीवाले व पथारी व्यावसायिकांना प्रमाणपत्राचे वाटप करून पालिकेने कारवाईवर लक्ष केंद्रित करावे.

कॉलेज रोडवर हॉटेल, टपऱ्या, फेरीवाले आणि अटोरिक्षाचालकांच्या अतिक्रमणाने विळखा घातला आहे. थत्ते नगर रस्त्याच्याकडेला खेटूनच अनेक टपऱ्यांनी, दाबेलीचे गाडे, चर्मकार व्यावसायिक यांनी बस्तान मांडले आहे. सुरुवातीला तात्पुरती असलेली ही अतिक्रमण आता कायमस्वरुपी झाली आहेत. या रस्त्यावर अतिक्रमणासोबत फेरीवाले तसेच ऑटोरिक्षाचा गराडा रोडला कायम पडलेला असतो. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या या भागात अधिक असतात.

या रोडने जाताना वाहनधारकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. खादयपदार्थ विक्रेते असलेल्या या फेरीवाल्यांकडे ग्राहकांची गर्दी होत असल्याने त्यांची वाहने देखील रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे इतर वाहनधारकांना चांगलाच त्रास होतो. सायंकाळी पादचारी तसेच वाहनधारकांची या ठिकाणी गर्दी होते. या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे चित्र दिसून येते.

कॉलेज रोडवरील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे पालिकेने बेकायदा पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर हॉटेल चालकांवर कारवाई करावी, यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. कॉलेज रस्त्यावर फूटपाथवरील पथारी व्यावसायिक व फेरीवाल्यांवर अतिक्रमण कारवाईचा हातोडा फिरवावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

कॉलेज रोडवर थत्ते नगर कॉर्नर ते कॅनडा कॉर्नर भागात अतिक्रमणांमुळे गुन्हेगारी वाढीस.

– हि अनाधिकृत हातगाडी गुन्हेगारांची अड्डे झालेली आहेत.

– या हातगाड्यावर कायम पडीत असलेली टपोरी कॉलेजला जाणाऱ्या मुलींची छेड काढणे.

– येणाऱ्या जाणाऱ्यांशी वाद घालणे, भांडण करून त्यांना लुटणे इत्यादी कामे इथे चालतात.

-अतिक्रमणांनी अधिकृत दुकानदारांची कंबरडे मोडले.

-अधिकृत दुकानदारांना विविध मोठेमोठे खर्च असतात.

– आयकर भरावा लागतो.

– प्रॉपर्टी टॅक्स

– जी एस टी

– कामगारांचा पगार

याउलट हातगाड्यांना हे कुठलेली खर्च लागत नाही. त्यामुळे मोठ्या दुकानांत महागात मिळणाऱ्या वस्तू हातगाड्यांवर स्वस्तात व सहज उपलब्ध होत असल्याने, इथे मोठ्याप्रमाणावर ग्राहक वर्ग असतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!