Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा रद्द

Share

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या रविवारी नियोजित नाशिक जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आहे. शहरातील न्यायालयाच्या उदघाटनाचे काम रद्द झाल्यामुळे मुख्यमंत्री येणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान येत्या १९ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी महाजानदेश यात्रेच्या समारोप प्रसंगी नाशकात येत आहेत. यावेळी नाशिकमध्ये या यात्रेचा समारोप शक्तिप्रदर्शन करून केला जाणार आहे. यासाठी आतापासूनच भाजपचे नियोजन सुरू झाले आहे. त्यामुळे ही बहुधा मुख्यमंत्र्यांनी उद्याचा नाशिक दौरा रद्द केल्याची चर्चा आहे.

आज सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सभास्थळाची पाहणी करण्यात आली असून तपोवन परिसरात ही सभा होणार आहे. महाजनादेश यात्रेची सांगता १३ ते १९ दरम्यान तपोवन मैदानात होणार असून यासाठी या सभेत भाजपचे राज्यातील सर्व मंत्री हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री या सभेत शक्तिप्रदर्शन करणार असून, त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्र्यांबरोबरच राज्यातील खासदार, आमदार व पदाधिकारी या सभेला हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या यात्रेची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!