Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

जिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार

Share

नाशिक । पुढील पाच दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता इगतपुरी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा संशोधन केंद्राने वर्तविली आहे. अगोदरच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पावसाच्या शक्यतेने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

शनिवारी (दि.30) दिवसभर शहर व जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी अधिक दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. 3 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तसेच, हलका पाऊसदेखील पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा परिणाम बाजरी, मका, ज्वारी या पिकांवर होण्याची चिन्हे आहेत.

तसेच द्राक्ष बागा व डाळिंब बागांनाही ढगाळ वातावरण व पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी पुरता बेजार झाला असताना पुन्हा एकदा आस्मानी संकट बळीराजासमोर उभे राहिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!