Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक शहरालाही हवामान बदलाचा फटका; दरवर्षी असामान्य पाउस

Share

नाशिक । प्रशांत निकाळे

हवामानातील बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे याचा संपूर्ण पृथ्वीवर फार वाईट परिणाम झाला आहे. यामुळे ग्रहाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि याचे सर्व कारण मानव, असे जाणकार मानतात. नाशिक शहर ही यापासून काही वेगळे राहिलेले नाही. मागील १८ वर्षांत शहरात पावसाच्या स्वरूपात व तपमानात तीव्र बदल झाला आहे.

गेल्या दोन दशकात शहराचे किमान किंवा कमाल दोन्ही तापमान सराअसरीपेक्षा ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) कडून मिळालेला डेटा दर्शवितो की कालांतराने मूलभूत पाऊस संरचना बदलली आहे. शहरात मागील दोन दशकात पावसाच्या टक्केवारी आणि वेळेत कमालीचा बदल दिसून आला आहे.

हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, विभाग वर्षांत दोन प्रकारे पावसाची नोंद करतात. जून ते सप्टेंबरच्या सप्टेंबर हा हंगामी पाऊस तर उर्वरित काळात पाऊस हा एकूण पावसात गणला जातो. २००९ साली हंगामी पर्जन्यमान केवळ ३७८. १ मिमी होते तर एकूण पाऊस हा ६०८मिमी इतका होता. मान्सूनला त्या विशिष्ट वर्षात विलंब झाला आणि हंगामा नंतर पावसाला सुरुवात झाली.”, असे आयएमडीच्या सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी असेही सांगितले की २०११ पासून दरवर्षी रेकॉर्ड केलेले किमान तापमान प्रत्येक वर्षाकाठी वाढत आहे आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे.

महापालिकेचे उद्यान विभागाचे अधीक्षक शिवाजी आमले यांनी विस्तारित सांगितले की, वाढते शहरीकरण, अफाट प्रमाणात झालेली वृक्षतोड आणि मानवजातीच्या लालसेच्या परिणामस्वरूप जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदल झाला आहे. नाशिक या पासून काही दूर नाही. दररोज शहरात वाढ होत आहे, आपले निवास, रस्ते आणि इतर अनेक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी झाडे तोडली जात आहेत. याचा थेट परिणाम हवामान बदलाशी होत असून दिवसेंदिवस पाऊसाचे प्रमाण कमी अधिक होताना दिसून येत आहे.

दरम्यान राज्याच्या वृक्ष लागवड अभियानात सर्वच शहरांनी सहभाग नोंदविला असून यात नाशिक महानगरपालिकेनेही पुढाकार घेतला आहे. यासाठी महापालिका सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. आता नव्या धोरणानुसार फक्त वृक्षारोपणच नव्हे तर त्यांचे संरक्षणही करीत आहोत. जनतेने देखील यात पुढाकार घेतला पाहिजे ही एक सार्वजनिक चळवळ बनली पाहिजे तरच आपण खरोखर यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन आमले यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!